खेळातून जिंकण्याची जिद्द निर्माण होते .......कुलगुरू डॉ. इन्द्र मणि
महाराष्ट्र राज्य आंतर
विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी २० (लेदर बॉल )क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गोंडवाना
विद्यापीठ गडचिरोली येथे दिनांक ११ ते १७ मार्च २०२४ दरम्यान करण्यात आले होते. स्पर्धेत महाराष्ट्रातून मुंबई, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर
व इतर अश्या एकूण १६ विद्यापीठ संघाने
सहभाग नोंदविला. सुरवातीच्या उपांत्य सामन्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या
संघाने गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संघाचा ३९ धवांनी तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात
सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाने लोणेरे संघाचा पराभव करून दोन्ही संघाने
अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला. अंतिम सामन्यात वनामकृवि परभणी संघाने उपविजेतापद
तर सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाने विजेतेपद पटकविले. विजेत्या व
उपविजेत्या दोन्ही संघांनी साखळी सामन्या मध्ये उत्कृष्ठ प्रदर्शन केले. वनामकृविच्या
क्रिकेट कर्मचारी संघाने कुलगुरू चषक टी २० (लेदर बॉल )क्रिकेट स्पर्धेतील पदार्पणच्या दुसऱ्याच
वर्षी मिळवलेले यशाने विद्यापीठ प्रशासनात आणि कार्माचार्यामध्ये आनंदाचे वातावरण
निर्माण झाले. या यशाबद्दल माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि,
यांनी संघाचे अभिनंदन केले आणि खेळातून जिंकण्याची जिद्द निर्माण होते आणि
कार्यक्षमता वाढते म्हणून प्रत्येकांनी एकद्यातरी खेळाचा छंद जोपासावा असा सल्ला
दिला. २५ व्या दीक्षांत समारंभाच्या निमिताने विद्यापीठात आलेले वनामकृविचे माजी कुलगुरु डॉ. के. पी. गोरे, डॉ. बी व्यंकटेश्वरलू आणि डॉ. अशोक ढवण, तसेच संचालक
शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक विस्तार डॉ धर्मराज गोखले, संचालक
संशोधन डॉ. जगदीश जाहागीरदार, कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक
श्री प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री. दिपक कशाळकर, विध्यार्थी
कल्याण अधिकारी डॉ. पुरषोत्तम झवर, सहाय्यक कुलसचिव श्री रामजी खोबे तथा सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी
व विद्यापीठ परिवार यांनी संघाचे अभिनंदन करून भविष्यातील यशासाठी शुभेच्छा
दिल्या. या स्पर्धेत परभणी संघाच्या वतीने श्री मारोती शेल्लाळे यांनी सर्वात
जास्त विकेट घेऊन स्पर्धेत दुसऱ्या स्थान
प्राप्त केले. तसेच डॉ. धीरज पाथ्रीकर (कर्णधार) यांनी परभणी संघातर्फे सर्वाधिक
धावा काढून स्पर्धेत चौथ्या स्थानी राहिले. दोघांनी तसेच संघाच्या इतर कर्मचारी
खेळाडूंनी (कऱ्हाळे, ढगे, शे.जमीर, सावंत, ननवरे, यादव, बनसोडे, पिल्लेवड, गरुड, शे.उस्मान, शिंदे व मोहिते असे सर्वांनी एकजुटीने संघाला अंतिम
सामान्या पर्यंत नेण्याची महत्वाची कामगिरी पार पाडली. या संघांचे विद्यापीठ
परिवारात सर्वत्र कौतुक होत आहे.