Pages

Saturday, March 16, 2024

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाद्वारे जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा.

 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने सेलू येथील एल. के. आर. आर. प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये  दिनांक 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम व्याख्यान, प्रात्यक्षिके आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे,  प्रमुख मार्गदर्शक म्हणून साधन संपत्ती व्यवस्थापन आणि ग्राहक विज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख डॉ.जयश्री रोडगे- सरकटे,  शिक्षण सहयोगी प्रा. ज्योती मुंडे, पद्युत्तर विद्यार्थिनी कु. आरती सूर्यवंशी या होत्या. यावेळी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी समीर सय्यद, सागर बांडूरकर, अनिकेत मोरे, रुपेश, दिनेश डोके, महेश जीवने  व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. कार्तिक रत्नाला व शिक्षक वृंद उपस्थित होते.

     कार्यक्रमात डॉ. जयश्री रोडगे-सरकटे यांनी विद्यार्थ्यांना ग्राहकांच्या अधिकार व जबाबदाऱ्या सांगितल्या तर प्रा. ज्योती मुंडे यांनी विद्यार्थ्यांना ग्राहकांचे कृती व नियम सांगितले. तसेच कु. आरती सूर्यवंशी यांनी खाण्याच्या पदार्थांमधील भेसळ विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्षरीत्या करून दाखवले. यात दुधामधील भेसळ, मिरची पावडर, खवा, तूप, मध, दालचिनी, कॉफी, गव्हाचे पीठ, साखरेचे पीठ व हळद इत्यादी पदार्थांमध्ये भेसळ कशा पद्धतीने केली जाते व ते आपण पाणी व आयोडीनच्या साहाय्याने कसे ओळखायचे हे शिकवले. या कार्यक्रमातून ग्राहकांनी वस्तूच्या खरेदी व सतर्क कसे  राहायचे, कोणत्या वस्तू खरेदी करायच्या, त्याच्या किमती, वस्तू वापरावयाची अतिंम तारीख या बाबत योग्य मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमामध्ये एल. के. आर. आर. प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.