वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि यंत्र व शक्ति अभियांत्रिकी विभागाच्या संशोधन अभियंता व विभाग प्रमुख डॉ. स्मिता सोलंकी आणि विद्यापीठाचे बीजोत्पादन सहसंचालक डॉ. शिवाजी म्हेत्रे, यांना महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्कार’ दिनांक ७ जून रोजी देण्यात आला. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात पार पडलेलेल्या ५२ व्या संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती बैठकीच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्ष तथा डॉपदेकृविचे मा. कुलगुरू डॉ. शरद गडाख, वनामकृविचे मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, मफुकृविचे मा. कुलगुरू डॉ प्रशांत पाटील, डॉबासाकृविचे मा. कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी राज्याचे फलोत्पादन संचालक श्री कैलास मोते, विधान परिषद सदस्य ॲड. किरण सरनाईक, डॉपदेकृवीच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. आमदार रणधीर सावरकर, श्री मोरेश्वर वानखेडे, श्री. विठ्ठल सरप, श्री. जनार्धन मोगल, डॉ. विजय माहोरकर, हेमलता अंधारे, कृषि सहसंचालक अमरावती विभाग श्री किसन मुळे, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, डॉ. खिजर बेग, डॉ. शिंगारे, डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. एस. एस.माने, डॉ. उदय खोडके, डॉ. मोकळे, डॉ. बोडखे, डॉ. हळदणकर, कृषि परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, कार्यकारी परिषद सदस्य श्री विनायक काशीद आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यंत्र व शक्ति अभियांत्रिकी मधील ड्रोन तंत्रज्ञान, पशु शक्तीचा वापर, यंत्रे व अवजारे विकासमध्ये भरीव अश्या योगदानाबद्दल डॉ. स्मिता सोलंकी यांना तर आणि करडई, ज्वार, सोयाबीनचे अतिशय लोकप्रिय वाण विकासामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि सोयाबीनच्या बिजोत्पनाबद्दल डॉ. शिवाजी म्हेत्रे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दोघांचेही पुरस्कार स्वीकारण्यासाठी वनामकृविचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग हे मंचावर आवर्जून उपस्थित होते. पुरस्काराबद्दल कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, बिजोत्पादन संचालक डॉ. देवराव देवसरकर आदीसह कृषि विद्यापीठाचे अधिकारी, शास्त्रज्ञ व कर्मचारी यांनी डॉ. स्मिता सोलंकी आणि डॉ. शिवाजी म्हेत्रे यांचे अभिनंदन केले आहे.
डॉ. स्मिता सोलंकी यांचे संशोधन कार्य
डॉ. शिवाजी म्हेत्रे यांचे संशोधन कार्य