Pages

Wednesday, July 10, 2024

कृषि विद्यापीठ शेतकऱ्यांसाठी सदैव कार्यरत....डॉ. उदय खोडके

 पिंप्री देशमुख येथे पीक लागवड तंत्रज्ञान मार्गदर्शन व चर्चासत्राचे अयोजन


वंसतराव नाईक मराठावाडा कृषि विद्यापीठातील, उद्यानविद्या महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम व कृषि औदयोगिक सलग्नच्या उद्यानकन्यामार्फत दि. १० जुलै रोजी मौजे पिंप्री देशमुख येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत या उपक्रमांतर्गत पीक लागवड तंत्रज्ञान मार्गदर्शन व चर्चासत्राचे अयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके हे अध्यक्ष होते तर मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, तांत्रिक अधिकारी डॉ. गणपत कोटे, माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ.  डॉ. जी. डी. गडदे, सरपंच श्री. दिगंबर सावणे, उप सरपंच श्री. नागेश देशमुख आदींची उपस्थिती होती

अध्यक्षीय भाषणात बोलताना शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम उपक्रमाबाबत व विद्यापीठाने शेतीविकासामध्ये केलेल्या योगदानाची माहिती दिली. तसेच विद्यापीठ शेतकरी केंद्रीत कार्यावर भर देत असून शेतकऱ्यांसाठी विद्यापीठ सदैव कार्यरत असल्याचे नमूद केले.  

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. व्ही. एस. खंदारे यांनी केली. यावेळी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, यांनी विद्यापीठातील विस्तार कार्यातील विविध उपक्रमाची माहिती दिली आणि विद्यापीठाचे  तंत्रज्ञान प्रसार शेतकऱ्यापर्यंत कश्या पध्द्तीने केले जाते याबद्दल मार्गदर्शन केले. व्यवस्थापक डॉ. जी. डी. गडदे यांनी खरीप पिकातील बीज प्रक्रियातण व अन्नद्रव  व्यवस्थापन या विषयवर मार्गदर्शन केले तर  पीक रोगशास्त्रज्ञ डॉ. जी. पी. जगताप यांनी पिकावरील रोग नियंत्रण व बायोमिक्सचा विविध पिकासाठी वापर यावर, कृषि कीटकशास्त्र डॉ. डी. डी. पटाईत यांनी खरीप पिकावरील किडीचे नियंत्रण याबाबत तसेच श्री. एम . बी. मांडगे यांनी कापूस पिक व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी श्री. विठ्ठल पांचाळ यांनी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. एम. कलालबंडी, कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन पव्हणे व कु. ज्योती कळंबे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वाती पुंड व कु. जया सावंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते करीता उद्यानकन्या कु. कीर्ती खेंदाड, गायत्री कुशराम, चैताली पाकधने, कोमल पौळ, धनश्री रासवे व स्नेहल शिंगाडे व समस्त गावकरी पिंप्री देशमुख यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे शेवटी वृक्षदिंडी काढून अध्यक्षाच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.