Pages

Thursday, August 15, 2024

विकसित भारत बनविण्‍यात युवकांची महत्‍वाची भुमिका ...... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवित ७८ वा स्‍वातंत्र दिन उत्‍साहात 

२०४७ पर्यंत भारतास विकसित राष्‍ट्र बनविण्‍याचा संकल्‍प केला असुन यात युवकांची भुमिका मह‍त्‍वाची राहणार आहे. समृध्‍द भारत, सशक्त भारत करिता कार्य करण्याची आपली सर्वांची जिम्मेदारी आहे. अनेक क्षेत्रात जागतिक स्तरावर भारत अग्रणी आहे, सध्याचे युगे स्पर्धेचे युग असून आपल्या कार्यामध्ये आपणास अचूकता ठेवावी लागेल. सर्वांनी एकजुट होऊन वसुधैव कुटुंबकम या भावनेने कार्य करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ७८ वा स्‍वातंत्रदिन उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रांगणात माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, देशाच्या विकासासाठी माननीय पंतप्रधान यांनी दिलेल्‍या जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान या तत्त्वावर कार्य करावे लागेल. भारत जगात विविध अन्‍नधान्‍य, दुध, अंडी, फळे, भाजीपाला आदी उत्‍पादनात प्रथम वा द्वितीय क्रमांक वर आहे. शेती क्षेत्रास चालना देण्यासाठी या वर्षाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्‍यात आलेली आहे. शेतीमध्ये हवामान बदलाचे मोठे आव्हान आहे, यामुळे अनेक पिकांच्या उत्पादनामध्ये चढउतार होत आहे, याचा परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनमानावर होत आहे.  हवामान बदलावर आधारित संशोधनास विद्यापीठ प्राधान्‍य देत आहे, विद्यापीठ अतिशय जोमाने कार्य करत असून नावीण्‍यपुर्ण क्षेत्रात संशोधना करित आहे. शिक्षणामध्ये विद्यार्थी केंद्रीत शिक्षण, शेतकरी केंद्रीत विस्तार कार्य, नवाचार केंद्रीत संशोधन आणि कर्मचारी केंद्रीत प्रशासन या तत्‍वावर कार्य करित आहे. ज्वार व बाजरा यांच्या जैवसमृद्ध वाणामध्ये देशपातळीवर प्रचलित झाला आहे. तुरीचा संकरित वाण आणि कापुस पिकात बीटी मध्‍ये तीन सरळवाणात विकसित करणारे राज्‍यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. हवामान अनुकुल सोयाबीनचे अनेक वाण विकसित केले असून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झालेले आहेत. विद्यापीठाने विदेशातील व देशातील अग्रगण्‍य विद्यापीठे व संस्‍थेसोबत सामंजस्‍य करार केले असुन याचा लाभ कुशल मनुष्‍यबळ निर्मिती करण्‍यास होणार आहे. विद्यापीठाने बीजोत्‍पादन वाढीचे लक्ष ठेवले असुन यावर्षी विद्यापीठाचे बीजोत्‍पादन ७००० क्विंटल वरून १०२०० क्विंटल पर्यंत गेले असुन यावर्षी २०००० क्विंटलचे लक्ष आहे. यामुळे विद्यापीठ विकसित दर्जेदार बियाणे जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवापर्यंत पोहचेल. शेतकऱ्यांचे कल्याण आणि शेती विकासाकरिता आपण समर्पण भावनेने कार्य करण्याच्या संकल्प करण्‍याचे आवाहन करून त्‍यांनी ७८ व्या स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्‍ट्रीय छात्र सैनिकांनी छात्रसेना अधिकारी डॉ जयकुमार देशमुख यांच्‍या नेतृत्‍वात माननीय कुलगुरू यांना मानवंदना दिली. कार्यक्रमास कुलसचिव डॉ संतोष वेणीकर, शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, संशोधन संचालक डॉ के एस बेग, सन्‍माननीय प्रमुख अतिथी श्रीमती जया मिश्रा, डॉ डि एस मिश्रा, श्रीमती सरिता मिश्रा, श्री राजेंद्र कपुर, श्री बलदेवसिंह, श्री प्रमोद पुरी, डॉ. अनिलकुमार पाण्डेय,  श्रीमती मधु कपुर, श्रीमती मंजित कौर, श्रीमती भारती पुरी, श्रीमती मालती पाण्डेय, तसेच विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ पी आर झंवर, विविध महाविद्यालयाचे प्राचार्यविभाग प्रमुख प्राध्‍यापकशास्‍त्रज्ञअधिकारीकर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी केले.