Pages

Wednesday, August 14, 2024

दिनांक २१ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२४ दरम्‍यान परळी वैद्यनाथ (बीड) येथे राज्‍यस्‍तरीय कृषी महोत्‍सव

 आयोजनाकरिता मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि  यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न


महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठे आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने शेती विकासासाठी विविध पिकांचे संकरीत तसेच सरळ वाण, आधुनिक लागवड पद्धती, अवजारे, मृद आणि जलसंधारणाचे तंत्रज्ञान, पशुधनमधील संकरीत जातींची पैदास, विविध पिकावरील काढणी पश्चात प्रक्रिया, साठवणूक, विक्री व्यस्थापन आदी बाबीवर संशोधन केलेले आहे. हे संशोधन शास्वत शेतीसाठी अतंत्य उपयुक्त असून त्याचे पूर्णतः अवलंबन होणे आवश्यक आहे. याकरिता हे तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत विविध माध्यमाद्वारे  पोहोचणे आवश्यक असल्यामुळे कृषी विभागाच्‍या पुढाकाराने दिनांक ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२४  या कालावधीत राज्‍याचे कृषि मंत्री मा ना श्री धनंजय मुंडे यांच्‍या संकल्‍पनेतुन आणि मार्गदर्शनाखाली परळी वैद्यनाथ (बीड) येथे राज्‍यस्‍तरीय कृषी महोत्‍सव – २०२पार पडणार आहे. पाच दिवस चालणा-या महोत्‍सवात राज्यातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन  नवीन वाणांची निर्मिती याबाबत माहितीकृषि प्रात्‍यक्षिके पाहण्‍यास मिळणार असुन शेतकऱ्यांशी थेट संवादविविध चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिके आणि विविध योजनांची शेतकऱ्यांना थेट माहिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), महात्मा फुले कृषी विद्यापीठराहूरी (अहमदनगर)डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठदापोली (जि. रत्नागिरी) आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ (नागपुर) या पाच विद्यापीठांनी केलेली संशोधनेकृषी विभागाची प्रात्यक्षिकेपरिसंवादतंत्रज्ञानराज्यातील शेतक-यांच्या यशोगाथा, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केंद्र, विक्रेता खरेदीदार सम्मेलन, शेतकरी सन्मान समारंभ, सेंद्रिय शेतीमाल विक्री, रानभाजी महोत्सव, कृषी अवजारे प्रदर्शन, स्वयंसहायता महिला बचत गट निर्मित पदार्थांचे विक्री व प्रदर्शन असे एकत्रित सादरीकरण करणारा हा राज्यस्तरीय कृषी महोत्सव असुन यात राज्यभरातील विविध प्रयोग ज्यामध्ये उत्पादनक्षम शेतीएकात्मिक पीक व्यवस्थापनएकात्मिक किड व रोग व्यवस्थापनएकात्मिक शेती व्यवस्थापनसेंद्रिय व नैसर्गिक शेतीची प्रात्यक्षिके विद्यापीठांकडून सादर केली जाणार आहेत. राज्यभरातील शेतकरी बहुसंखेने या महोत्सव आणि प्रदर्शनास भेट देतीलअसा विश्वास कृषि मंत्री मा ना श्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

या कृषी महोत्सवाचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात होत असल्याने या विद्यापीठाचा विशेष सहभाग राहणार आहे. त्या अनुषंगाने महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाकरिता माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि  यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १४ ऑगस्ट रोजी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, कुलसचिव डॉ. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. पी. डी. निर्मळ, विद्यापीठ उप अभियंता डॉ. डी डी टेकाळे, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्रभारी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक उपस्थित होते. महोत्सवामध्ये विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी विभागाच्या दालनात विद्यापीठाने विकसित केलेले कृषी अवजारे, सिंचन पद्धती,  ड्रोन तंत्रज्ञान, अपारंपारिक ऊर्जा इत्यादी बाबतच्या तंत्रज्ञानाचा समावेश ठेवणार आहे तसेच मिल्क - सिल्क संकल्पनेला चालना देण्याच्या अनुषंगाने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आणि रेशीमवर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी या विभागाच्या दालनात जिवंत नमुने व तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात येणार आहे. सेंद्रिय शेती संबंधित जिवंत देखावा उभारण्यात येणार आहे. याबरोबरच महोत्सवालगतच्या शेतकऱ्यांच्या शेतावर ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. तांत्रिक सत्रात विविध विषय आणि व्याख्यात्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये कृषी उद्योजक, प्रगतशील शेतकरी, शास्त्रज्ञ यांचा व्याख्याने आणि विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञान पासून ते विपणनापर्यंत माहिती देणाऱ्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कापूससोयाबीन आणि इतर तेलबियांच्या प्रक्रिया उद्योगत्यासंबंधी होणारं संशोधननवीन वाणांचं संशोधनबदलेले वातावरण पर्जन्य आणि उष्णता यांच्या बदलांचा वेध घेऊन करण्यात येत असलेलं संशोधन याचेही सादरीकरण महोत्सवात करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेले बायोमिक्स व बायोफर्टीलायझर विक्रीचे दालन ही उभारण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वन नेशन - वन हेल्थ या संकल्पनेला (माती-पाणी-पर्ण-प्राणी-मनुष्य) प्रोत्साहीत करण्याच्या हेतूने दालन उभारण्यात येणार आहे अशी माहिती विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवर यांनी दिली

महोत्सवात कृषि विभागकृषि विद्यापीठे यांच्यासह शासनाचे विविध विभाग याबरोबरच कृषि तंत्रज्ञानात सहभाग असणारे विविध खासगी कंपन्‍या यांची दालने असणार आहेत. याशिवाय कृषी विज्ञान केंद्रमहाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळमहाबीजमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळराष्ट्रीय फलोत्पादन अभियान अशा योजनांची माहिती दालनेकृषी निविष्ठातंत्रज्ञानसिंचन साधने, शेतीविषयक अवजारेमशिनरीनवनवीन यांत्रिकीकरणऑटोमेटेड फार्मिंगशेतीपूरक लघुउद्योगांसाठी विशेष दालनराज्यभरातील विविध शेतकरी गटांनी तयार केलेली उत्पादने आदींसह महोत्सवात एकूण चारशेहून अधिक दालने असणार आहेत. तरी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या महोत्सवास भेट देऊन येथील चर्चासत्रेप्रदर्शनप्रात्यक्षिके याचा लाभ घ्यावाअसे आवाहन  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग (महाराष्‍ट्र राज्‍य) यांच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.