Pages

Sunday, October 13, 2024

मुख्यमंत्री माननीय ना. श्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते वनामकृविच्या नांदेड येथील शासकीय कृषि महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या नांदेड येथील शासकीय कृषि  महाविद्यालयाचा इमारतीचा भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय ना. श्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते दिनांक १३ ऑक्टोबर रोजी संपन्न झाले. यावेळी  खासदार माननीय श्री अशोक चव्हाण, माननीय श्री हेमंत पाटील, माननीय आमदार श्री बालाजी कल्याणकर यांची सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि नोडल अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठा अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ पासून नव्यानेच सुरू झालेले हे शासकीय कृषि महाविद्यालय आहे. यामध्ये ६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून या वर्षापासून पूर्ण जागेवरती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन महाविद्यालय सुरू झालेले आहे.

या महाविद्यालयाच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांनी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कौशल्यवृद्धी करून रोजगाराभिमुख आणि दर्जेदार शिक्षण द्यावे. याबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांना महाविद्यालयाद्वारे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच महाविद्यालयाची नवीन वास्तू कृषी तंत्रज्ञान माहितीचे माहेर घर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांनी मान्यवरांचे स्वागत करून भूमिपूजन समारंभास आल्याबद्दल आभार मानले तसेच महाविद्यालय विदयार्थी आणि शेतकरी केंद्रित कार्यावर भर देत असल्याचे नमूद केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे नोडल अधिकारी डॉक्टर राजेश कदम यांनी महाविद्यालयाच्या कार्याची माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ गजेंद्र लोंढे, उपविद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, प्राचार्य डॉ. नरेशकुमार जायेवार उपविद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, शाखा अभियंता इजि ढगे, कापूस संशोधन केंद्राचे डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. सुजाता धूतराज, डॉ. विजय चिंचाने, डॉ. पवन ढोके, डॉ. संजय देवकुळे, उज्वला सुरेवाड, प्रकाश सिंगरवाड, संतोष राठोड, जी पी इढोले, वर्षा ताटेकुंडलवार, शाखा लेखाधिकारी श्री खरतडे आदीसह नवीन प्रवेशित सर्व विद्यार्थी, अधिकारी आणि परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.