Pages

Wednesday, October 23, 2024

वनामकृविच्या विस्तार शिक्षण परिषदेची २७ वी बैठक यशस्वी संपन्न

 मराठवाड्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळावा.... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत हे विस्तार कार्याचे देशभरात उत्कृष्ट मॉडेल म्हणून सिद्ध होईल... सहसंचालक (विस्तार) मा. डॉ. आर. एन. पडारीया



वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालयद्वारे विस्तार शिक्षण परिषदेची २७ वी बैठक दिनांक २३ ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे होते. विशेष अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या भारतीय कृषी संशोधन संस्थेचे सहसंचालक (विस्तार) मा. डॉ. आर. एन. पडारीया हे होते. बैठकीसाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग,  कुलसचिव श्री संतोष वेणीकर, विद्यापीठ अभियंता इंजि. दीपक कशाळकर, सहाय्यक नियंत्रक वैशाली ताटपल्लेवार, कृषि विभागाचे श्री रवी हरणे, विस्तार शिक्षण परिषदेचे सदस्य श्री जनार्दन आवरगंड, श्री भीमराव डोणगापूरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय मार्गदर्शनात कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांनी त्यांच्या विस्तार कार्यातून “मेरा गाव मेरा गौरव’ द्वारे सहाशे गावात विशेष कार्य केल्याचे नमूद केले. या उपक्रमातून तेथील शेतकऱ्यांना एक सन्मान जनक उभारणी मिळाली. महाराष्ट्रातील शेतकरी एकजुटीने कार्य करून कामावर लक्ष केंद्रित करतो. महाराष्ट्राचा शेतकऱ्यांचा आदर्श व अनुकरण करण्याचे उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्यांनीही इच्छा प्रकट केल्याचे त्यांनी नमूद केले. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळावा अशी ही आशा त्यांनी व्यक्त केली. कृषी क्षेत्रातील खाजगी किंवा शासकीय यंत्रणा यांचे सर्वांचे कार्य शेतकरी केंद्रित असावे. जीवन जगण्यासाठी हवा, पाणी आणि अन्न यांची मूलभूत गरज आहे. अन्न मिळण्यासाठी अन्नदाता म्हणजेच शेतकरी यांच्यावर अवलंबून राहावे लागते. शेतकरी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांचा विकास त्यांचे उत्पादन विक्री व्यवस्थापनातून होतो. यासाठी शेतकऱ्यांप्रती आदर व्यक्त करून शेतकरी केंद्रित कार्य करावे. महाराष्ट्र पुरोगामी असून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या काळात चार विद्यापीठे झाली. आजही काही राज्यात एकच विद्यापीठ आहे म्हणूनच महाराष्ट्र महाग्रेप, महाअनार सारखे मोठे ग्रुप  उभारून देशपातळीवर आघाडी घेत आहे असे प्रतिपादन केले.

सहसंचालक (विस्तार) मा. डॉ. आर. एन. पडारीया बोलताना म्हणाले की, विस्तार कार्यात देशात प्रथम महाराष्ट्राचे शेती विकासाचे उदाहरण घेतले जाते. राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी देशभरातून प्राप्त पुरस्कारामध्ये देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रस्ताव अतिशय उच्च दर्जेचे असतात असे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रती गौरव उद्गार काढले. कृषी क्षेत्रात कार्य करण्यासाठी मनुष्यबळांची कमी होत आहे यासाठी यांत्रिकीकरण, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करावा. विस्तार कार्यात कोणत्याही विषयाचा शास्त्रज्ञ असो त्यांनी शेतकऱ्यांप्रती समर्पित भाव ठेवावा. विद्यापीठाचे माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत हे विस्तार कार्याचे देशभरात अतिशय उत्कृष्ट मॉडेल म्हणून सिद्ध होईल असे नमूद केले. शेतकरी हा ज्ञानी असतो अनेकदा त्यालाच त्याची जाणीव नसते ही बाब उदाहरणासह स्पष्ट करून सामाजिक वैज्ञानिक प्रयोगशाळा स्थापन कराव्यात असे स्पष्ट केले. संशोधनांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवून त्यांच्यात संशोधन वृत्ती वाढवावी. महिला सशक्तिकरण होण्याच्या दृष्टीने स्वयंसहायता बचत गटाची स्थापना होते त्यास कार्यक्षम पद्धतीने पुढे घेऊन जाणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. ग्रामीण युवकांना शेती व्यवसायाकडे वळवण्यासाठी ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे आणि जास्तीत जास्त युवक शेतीशी जोडून शेती समृद्ध करावे. शेतीमाल विक्री व्यवस्थापनासाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठा मिळवण्यासाठी संघटित होऊन कार्य करावे असे सुचित केले.

प्रस्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यापीठाच्या विस्तार कार्याचा आढावा दिला. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापरास प्राधान्य देऊन विद्यापीठ दैनंदिनी आणि दिनदर्शिका अध्यायावत करून वेळेच्या आत प्रकाशीत करण्यात येईल असे नमूद केले. विद्यापीठाचे तंत्रज्ञान जास्तीत जास्त समुदायापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने माझा एक दिवस माझा बळीराजा सोबत, ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवाद यासारखे अभिनव उपक्रम राबविण्यात येतील असे नमूद केले.

बैठकीमध्ये विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे २०२३-२४ या वर्षात राबविण्यात आलेल्या विविध विस्तार कार्याचा आणि मागील वर्षातील बैठकीच्या ठरावावर केलेली कार्यवाहीचा आहवाल मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख सादर केला.

श्री जनार्दन आवरगंड यांनी स्वतःची पार्श्वभूमी सांगून घडवण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाने केलेल्या सहकार्याचे आणि मार्गदर्शनाचे विवेचन केले. यातून विविध प्रक्रिया उद्योग उभारले तसेच शेती उत्पादन विक्री व्यवस्थापन स्वतः करता आले. याद्वारे त्यांना मोठा लाभ मिळत आहे. शेतकऱ्यांच्या खिशात अधिक पैसा मिळणे हाच खरा शेतकऱ्यांचा पुरस्कार असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाच्या ऑनलाइन मिटिंगचा लाभ होत असून आपत्ती येण्यापूर्वीच माहिती मिळते तसेच अनेक शेती समस्या सोडवण्यासाठी ही मदत मिळते. शेतकऱ्यांप्रती असलेला कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांच्या भावनेचा आदर व्यक्त करून त्यांचे आभार मानले.

श्री भीमराव डोणगापूरे यांनी प्राथमिक शिक्षकाचा राजीनामा देऊन ठामपणे शेती व्यवसायात वळाल्याचे नमूद केले. २०१० पासून शेती उद्योगास सुरुवात केली, सुरुवातीस अपयश आले परंतु शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून यश मिळविले. विद्यापीठांनी त्यांना विस्तार शिक्षण परिषदेवर सदस्य म्हणून नेमले याचा लाभ अनेक शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्याकरता करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, विस्तार कृषि विद्यावेत्ता, शास्त्रज्ञ , कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक, विषय विशेषज्ञ अधिकारी आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले तर आभार विस्तार कृषी विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे यांनी मानले.



 The 27th meeting of the Extension Education Council concluded successfully.

Farmers from Marathwada should receive a national-level award... Hon. Vice-Chancellor Dr. Indra Mani. 

"My One Day with My Farmer” will become a model of excellence in extension work across the country ... Hon. Joint Director (Extension) Dr. R. N. Padariya.

The 27th meeting of the Extension Education Council at Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth was held on October 23rd. The meeting was chaired by Hon. Vice-Chancellor Dr. Indra Mani. As the special guest, Dr. R. N. Padariya, Joint Director (Extension) from the Indian Agricultural Research Institute under the Indian Council of Agricultural Research, New Delhi, was present. The meeting was attended by Dr. Bhagwan Asewar, Director of Extension Education; Dr. Khizar Beg, Director of Research; Mr. Santosh Venikar, Registrar; Engineer Deepak Kashalkar, University Engineer; Vaishali Tatpallewar, Assistant Comptroller; Shri Ravi Harne from State Agriculture Department and Extension Education Council members Mr. Janardan Awaragand, Mr. Bhimrao Dongapure, among others.

In his presidential address, Hon. Vice-Chancellor Dr. Indra Mani mentioned that through his extension work, particularly via the "Mera Gaon Mera Gaurav" initiative, significant efforts have been made in 600 villages. This initiative has brought a sense of dignity and upliftment to the farmers in those regions. He noted that farmers in Maharashtra work with unity and focus on their tasks. He also mentioned that farmers from Uttar Pradesh have expressed their desire to follow the example set by Maharashtra's farmers. Dr. Mani expressed hope that farmers from Marathwada will receive national-level awards. He emphasized that all work, whether by private or government organizations in the agricultural sector, should be farmer-centric. The basic needs of life—air, water, and food—are essential, and to ensure food, we are dependent on farmers, who are the most crucial part of the system. A farmer's progress comes from effective management of their production and sales. Hence, it is important to show respect for farmers and carry out farmer-centric activities. He further remarked that Maharashtra is a progressive state, and during the tenure of former Chief Minister Vasantrao Naik, four agricultural universities were established. Even today, some states have only one university. This is why Maharashtra is leading at the national level by establishing large groups like Mahagrape and Mahanar, taking the forefront in the agricultural sector.

Speaking on the occasion, Hon. Joint Director (Extension), Dr. R. N. Padariya, said that Maharashtra’s agricultural development is considered a leading example in extension work across the country. He highlighted that even for national-level awards, the proposals from Maharashtra's farmers are of very high quality, praising the farmers of Maharashtra. He emphasized the need for mechanization and the use of digital technologies, as manpower in the agricultural sector is declining. Dr. Padariya stressed that regardless of their scientific specialization, all researchers should maintain a dedicated attitude toward farmers. He expressed that the university's initiative, "My One Day with My Farmer," would become an excellent national model for extension work. He explained that farmers are knowledgeable, though often they are unaware of their own wisdom, and suggested the establishment of social science laboratories to demonstrate this through examples. He called for increasing farmers' participation in research and fostering a research-oriented mindset among them. In terms of women empowerment, he mentioned the importance of forming self-help groups and advancing them in an efficient manner. To attract rural youth to agriculture, he recommended providing training in modern technologies like drones and engaging more young people in agriculture to enhance its prosperity. He also suggested that for better market management of agricultural products, farmers should organize themselves to access both local and international markets.

In the opening remarks, Director of Extension Education, Dr. Bhagwan Asewar, provided an overview of the university's extension work. He emphasized the priority given to the use of digital technology and mentioned that the university's diary and calendar will be updated and published on time. Dr. Asewar also stated that to ensure the university's technology reaches the maximum number of communities, innovative initiatives like "My One Day with My Farmer" and online farmer-scientist agricultural dialogues will be implemented.

In the meeting, Dr. Prashant Deshmukh, Chief Extension Education Officer, presented a report on the various extension activities carried out by the Directorate of Extension Education during the year 2023-24, as well as the actions taken on the resolutions from the previous year's meeting.

Mr. Janardan Awaragand shared his background and explained the support and guidance he received from the Agricultural University, Krishi Vigyan Kendra, and the Agriculture Department in shaping his journey. Through their assistance, he was able to establish various processing industries and personally manage the marketing of agricultural products, which has brought him significant benefits. He emphasized that the true reward for farmers is having more money in their pockets. He acknowledged the benefits of the university's online meetings, which provide early information about potential disasters and help resolve many agricultural issues. Expressing respect for Vice-Chancellor Dr. Indra Mani’s dedication to farmers, he extended his gratitude to him.

Mr. Bhimrao Dongapure mentioned that he firmly transitioned into agriculture after resigning from his position as a primary school teacher. He began his agricultural journey in 2010, initially facing failures, but eventually achieved success by experimenting with new farming techniques. He expressed that being appointed by the university as a member of the Extension Education Council will help him in spreading technology to many farmers.

The meeting was attended by Associate Deans of various Colleges, Department Heads, Professors, Extension Agronomist, Scientists, Program Coordinators of Krishi Vigyan Kendras, Subject Matter Specialists, Officers, and a large number of staff. The event was conducted by Chief Extension Education Officer Dr. Prashant Deshmukh, while Prof. Arun Gutte, an extension agricultural scientist, gave the vote of thanks.