Pages

Sunday, November 24, 2024

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात पशुसंवर्धन यांत्रिकीकरण प्रकल्पाला मान्यवरांची भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्प - पशुसंवर्धन यांत्रिकीकरण या योजनेस नुकतीच भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थाचे  संचालक डॉ. मेहता आणि प्रकल्प समन्वयक डॉ. एस. पी. सिंह, कृषी अवजारे व यंत्र प्रकल्प समन्वयक डॉ. के. एन. अग्रवाल तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे सहाय्यक महासंचालक डॉ. के. सिंह आदी मान्यवरांनी भेट दिली.

सदर भेटीदरम्यान, सहाय्यक महासंचालक डॉ. के. सिंह व इतर मान्यवरांनी प्रकल्पामध्ये विकसित करण्यात आलेल्या अवजारे व यंत्रांची सविस्तर माहिती घेतली. अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्प - पशुसंवर्धन यांत्रिकीकरण या योजनेतील शास्त्रज्ञांनी प्रात्यक्षिके सादर करत या यंत्रसामग्रीची उपयुक्तता समजावून सांगितली. यावेळी बैलांना स्वच्छ करण्यासाठी विकसित केलेली ब्रश यंत्रणा, बैल धुण्यासाठी तयार केलेली यंत्रणा, तसेच आरामदायी गोठ्यांच्या नव्या तंत्रज्ञानाचा सविस्तर आढावा घेत मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

या प्रसंगी संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, पशु शास्त्रज्ञ डॉ. संदेश देशमुख, तसेच इंजि. अजय वाघमारे व दीपक यंदे यांचीही उपस्थिती होती. मान्यवरांच्या या भेटीने प्रकल्पातील संशोधनाला प्रेरणा मिळाली असून यामुळे पशुसंवर्धन क्षेत्रातील यांत्रिकीकरणाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.