Pages

Thursday, January 16, 2025

कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) मा. श्री निलेश हेलोंडे पाटील यांची मानवत येथील ॲग्री-फोटोव्होल्टेईक प्रकल्पाला भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत जर्मन एजन्सी जीआयझेड, सन सीड प्रायव्हेट लिमिटेड आणि वनामकृवि यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञान विकास संशोधना करिता परभणी जिल्ह्यामध्ये मानवत जवळ ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाला दिनांक १५ जानेवारी रोजी कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) मा. श्री निलेश हेलोंडे पाटील यांनी भेट दिली आणि प्रकल्पाचे संशोधन कार्य जाणून घेतले. मागील दोन वर्षांपासून विद्यापीठाचे कुलगुरू मा इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली सौरऊर्जा आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या विकासासाठी महत्त्वाचे संशोधन कार्य चालू आहे. याच पार्श्वभूमीवर मा. ॲड. श्री निलेश हेलोंडे पाटील यांनी आपल्या अभ्यास दौऱ्यादरम्यान विद्यापीठातील विविध संशोधन प्रकल्पांना भेटी दिल्या.

मानवत येथे कार्यन्वित ॲग्री-पीव्ही प्रकल्पाचा आढावा घेताना, प्रकल्पाच्या प्रमुख अन्वेषक डॉ. गोदावरी पवार यांनी चालू असलेल्या संशोधन कार्याची सविस्तर माहिती ॲड. हेलोंडे पाटील यांना सादर केली. या प्रकल्पाद्वारे सौरऊर्जा निर्मिती शेतीतील आधुनिक प्रयोग यांचा समन्वय साधून भविष्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे त्यांनी नमूद केले.

या भेटीदरम्यान अँड. हेलोंढे पाटील यांनी या संशोधन कार्याबाबत समाधान व्यक्त केले. सौरऊर्जा आणि शेती तंत्रज्ञानाचा हा समन्वय भविष्यातील शेतीतील आव्हानांवर मात करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल,” असे त्यांनी सांगितले.

या दौऱ्यादरम्यान विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. रवी हरणे, तालुका कृषी अधिकारी श्री. गोविंद कोल्हे, स्वावलंबन मिशनचे जनसंपर्क अधिकारी श्री. कृष्ण कुमार देठे आणि डॉ. कलालबंडी हेही उपस्थित होते.