Pages

Wednesday, February 12, 2025

छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त कृषी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव २०२५ च्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक १२ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विभाग प्रमुख डॉ सचिन मोरे, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. संजय पवार, डॉ. भाग्यरेषा गजभिये, डॉ. सोनकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिरामध्ये कृषी महाविद्यालयातील ६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचाही समावेश होता. रक्त संकलनाचे कार्य परभणी येथील शासकीय रक्तपेढीमार्फत रक्त संक्रमण अधिकारी डॉ. हर्षदा कांबळे, परिचारक श्री. विठ्ठल शिंदे, समाजसेवा अधीक्षक श्री. आत्माराम जटाळे, श्री. विकास कांबळे, रक्तपेढी तंत्रज्ञ मोहम्मद एजाज आणि त्यांच्या चमुने केले.

रक्तदान हे श्रेष्ठतम दान मानले जाते. रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो. अशा वेळी, रक्तदात्यांनी दिलेले रक्त हे त्यांना जीवनदान देऊ शकते. विशेषतः अपघातग्रस्त रुग्ण, गरोदर माता, थॅलेसेमिया आणि कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी रक्तदान अत्यंत महत्त्वाचे ठरते. समाजातील प्रत्येकाने नियमितपणे रक्तदान करून गरजू रुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव २०२५ समितीचे अध्यक्ष प्रथमेश श्रावण बुचाले, उपाध्यक्ष मंगेश भानुदास लोंढे, सचिव राजकुमार रमेश गडगिळे, कोषाध्यक्ष किशोर पंढरीनाथ जाधव आणि सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या शिबिराच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत, युवकांनी अशा सामाजिक उपक्रमांमध्ये उत्साहाने भाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले.