Pages

Monday, March 24, 2025

महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक उन्नती आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि

 परसबागेतील कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे दिनांक २४ मार्च रोजी आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत परसबागेतील कुक्कुटपालन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे हे होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात मा. डॉ. इन्द्र मणि यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत सांगितले की, महिलांचा आर्थिक विकास हा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे महिलांनी अशा प्रशिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी करावा. सातत्याने प्रयत्न केल्यास निश्चितच यश मिळते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महिलांनी आपल्या कुटुंबाच्या निर्णय प्रक्रीयेचा सक्रिय भाग होण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी सहयोगी संशोधन संचालक डॉ. सूर्यकांत पवार, फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित मुंडे, , कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती पाटगावकर, प्रशिक्षण समन्वयक व विषय विशेषज्ञ अनिता जिंतूरकर, विषय विशेषज्ञ डॉ. बसवराज पिसुरे, डॉ. संजुला भावर, श्री. अशोक निर्वळ आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी या प्रकल्पाची आणि आगामी विस्तार कार्यक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अनिता जिंतूरकर यांनी केले. प्रशिक्षण कार्यक्रमाला अनेक महिलांनी तसेच लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.