वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणीचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण
संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या निर्देशानुसार सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाने
माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा उपक्रम परभणी तालुक्यातील
ब्राह्मणगांव येथे दिनांक ९ जुलै २०२५ रोजी राबविला. यासाठी
महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांच्या
मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञांचा चमू तयार करण्यात आला होता.
या कार्यक्रमात विभाग
प्रमुख तथा चमू प्रमुख डॉ वीणा भालेराव यांनी
मानसिक व कौटुंबिक स्वास्थ्य, निरोगी जीवनासाठी संतुलित आहाराचे महत्त्व
आणि किशोरवयीन मुला-मुलींची योग्य काळजी या
विषयावर मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे समन्वयक तथा विभाग प्रमुख डॉ शंकर
पुरी यांनी शेती उद्योगात सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर या विषयांवर शेतकरी महिलांना
माहिती दिली.
या उपक्रमामध्ये
शास्त्रज्ञांनी बळीराजा सोबत एक दिवस घालवून त्यांच्या
समस्या जाणून घेतल्या, व सखोल चर्चा करण्यात आली, तसेच त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाचे
कार्यक्रम व्यवस्थापन श्री काळदाते यांनी केले होते तर उपक्रमास परिसरातील २५ हून
अधिक महिला शेतकरी भगिनीनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
या उपक्रमातून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती होऊन किशोरवयीन आरोग्य, महिलांचे मानसिक स्वास्थ्य व शेतीसाठी डिजिटल साधनांचा वापर याबाबत सकारात्मक संदेश पोहोचवण्यात यश मिळाले.