Pages

Wednesday, July 9, 2025

वनामकृविच्या अन्नतंत्र महाविद्यालयात व पशुवैद्यक व पशुविज्ञान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक प्राणीरोग दिन (World Zoonoses Day) साजरा

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालय व पशुवैद्यक व पशुविज्ञान (माफ्सू नागपूर) यांच्या राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाच्या "एक आरोग्य" प्रकल्प यांच्या वतीने संयुक्तरित्या जागतिक प्राणीरोग दिन  (World Zoonoses Day) साजरा करण्यासाठी "फुड बॉर्न झुनोझेस : अॅनिमल ओरीजन फुड्स" या विषयावर दिनांक जुलै रोजी अन्नतंत्र महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.  यावेळी शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.आर.बी.क्षीरसागर, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.राजुरकर, प्रकल्पाचे समन्वयक डॉ.आर.एन.वाघमारे यांची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी या प्रकल्पाचे शीर्षकाचे विश्लेषण करतांना असे सांगितले की, मातीचे, वनस्पतींचे, प्राण्यांचे व मानवीय आरोग्य एकमेंकाशी परस्पर संबंधीत आहेत. तसेच प्रगती आणि समृध्दीसाठी माणसाचे मानसीक व शारीरीक आरोग्याचे महत्व याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयीन अभ्यासक्रमात या विषयाशी निगडीत अनिवार्य विषय समाविष्ठ करण्यात यावे असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी सार्वजनिक आरोग्य विकासाच्या महत्वांच्या टप्प्यांचा उल्लेख केला व एकूण ६० टक्के संसर्गजन्य रोग प्राण्यांच्या मासाद्वारे  मानवाच्या शरीरात संक्रमण करुन शिरकाव करतात व रोगांना प्रतिबंधीत करण्यासाठी सुरक्षित लाईव स्टॉकचा प्रचार व्हावा असे अधोरेखीत केले. तर प्राचार्य डॉ.एस.आर.राजुरकर यांनी हा दिवस साजरा करण्याचे महत्व व पाळीव प्राण्यांचे संगोपन करतांना घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. सहयोगी अधिष्ठाता डॉ.आर.बी.क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

यावेळी पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या "एक आरोग्य" प्रकल्पाचे समन्वयक, डॉ.आर.एन.वाघमारे, यांनी "अन्नजन्य प्राणी रोग : एक आरोग्य दृष्टिकोन" व सहयोगी प्राध्यापक डॉ.जी.एम.चिगुरे, यांनी "मांस आणि माशांमुळे होणारे परजीवी रोग" या विषयावर तांत्रिक मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे यशस्वीरित्या आयोजन करण्याकरीता अन्नतंत्र महाविद्यालयातर्फे डॉ.बी.एस.आगरकर, विभाग प्रमुख व पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या वतीने डॉ.आर.एन.वाघमाने यांनी कार्यशाळा समन्वयक म्हणुन काम केले.

या कार्यशाळेच्या प्रसंगी अन्नतंत्र महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख प्रा.डॉ.व्ही.एस. पवार, डॉ.व्ही.डी.सुर्वे, डॉ.के.एस.गाढे तसेच सहयोगी प्राध्यापक डॉ.एस.के.सदावर्ते, डॉ.जी.एम.माचेवाड इतर शिक्षकवर्गीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापिका डॉ.पी.पी.ठाकूर यांनी केले.