Pages

Thursday, March 26, 2026

मानोली येथे ज्वार पीक प्रात्यक्षिकांतर्गत शेतकरी मेळावा व प्रक्षेत्र भेट संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ, परभणी येथील ज्वार संशोधन केंद्रातर्फे अखिल भारतीय समन्वयीत ज्वार सुधार प्रकल्प, हैद्राबाद यांच्या सहकार्याने आद्य रेषीय ज्वार पीक प्रात्यक्षिक अंतर्गत मानोली (ता. मानवत, जि. परभणी) येथे बुधवार, दि. २५ मार्च २०२६ रोजी शेतकरी मेळावा व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या सहकार्याने पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्वार संशोधन केंद्राच्या प्रभारी डॉ. अंबिका मोरे होत्या.

अध्यक्षीय भाषणात समारोपात डॉ. अंबिका मोरे यांनी ज्वार संशोधन केंद्राच्या कार्याचा आढावा घेत सध्याच्या बदलत्या काळात शेतकऱ्यांनी ज्वारीच्या मूल्यवर्धित उत्पादनांद्वारे आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन केले.

यावेळी ज्वार संशोधन केंद्राचे माजी प्रभारी अधिकारी व वरिष्ठ ज्वार रोग शास्त्रज्ञ डॉ. तुकाराम गरुड तसेच माजी प्रभारी अधिकारी व वरिष्ठ ज्वार पैदासकार डॉ. लक्ष्मण जावळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ज्वार पिकाच्या सुधारित तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. परमेश्वर निर्वळ, प्रगतीशील शेतकरी श्री. रामभाऊ शिंदे तसेच आद्य रेषीय ज्वार पीक प्रात्यक्षिकाचे लाभार्थी व सहआयोजक श्री. मदन महाराज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे १०० शेतकरी उपस्थित होते.

मेळाव्याच्या प्रारंभी प्रास्ताविक ज्वार कृषि  विद्या शास्त्रज्ञ प्रा. प्रितम भुतडा यांनी केले. सूत्रसंचालन वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रशांत आंबिलवादे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. महेश दडके, ज्वार रोग शास्त्रज्ञ यांनी केले.

मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी ज्वार संशोधन केंद्रातील श्री. परसराम शिंदे, श्री. कृष्णा देशमुख, श्री. मोहसिन यांच्यासह मानोली येथील शेतकरी श्री. मदन महाराज शिंदे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.