Pages

Saturday, March 7, 2026

वनामकृवि येथे “शेती आणि ग्रामीण परिवर्तन” विषयावरील संकल्पोत्तर वेबिनारचे थेट प्रक्षेपण

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पानंतर “शेती आणि ग्रामीण परिवर्तन” या विषयावर भारतीय कृषि अनुसंधान परिषदद्वारा आयोजित करण्यात आलेल्या विशेष संकल्पोत्तर वेबिनारचे थेट प्रक्षेपण दिनांक ६ मार्च २०२६ रोजी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र (ATIC), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे आयोजित करण्यात आले. या वेबिनारमध्ये देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी उद्घाटनपर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान शेती, ग्रामीण विकास तसेच शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या विविध योजनांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

सदर कार्यक्रमास विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, सहयोगी प्राध्यापक डॉ. विशाल अवसरमल, डॉ. एस. पी. कौसल्ये, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. अनंत लाड, सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रीतम भुतडा तसेच वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. दिपाली सवंडकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात एकूण ८३ सहभागी (शेतकरी व अधिकारी) उपस्थित राहून वेबिनारचा लाभ घेतला. वेबिनारमध्ये शेती क्षेत्रातील नवीन संधी, शासकीय योजना तसेच ग्रामीण परिवर्तनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित शेतकरी व अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.