यंदाच्या खरीप हंगामात ‘एल-निनो’चा प्रभाव राहण्याची
शक्यता लक्षात घेता शेती क्षेत्रात हवामान अनुरूप नियोजन व तंत्रज्ञानाचा अवलंब
करण्यासाठी नांदेड येथे “शेतीच्या आकस्मिक नियोजनासाठी जनजागृती बैठक” दिनांक २५
मे २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या हैद्राबाद येथील केंद्रीय
कोरडवाहू शेती संशोधन संस्था (क्रीडा - CRIDA) यांच्या
संयुक्त विद्यमाने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. प्रमुख
पाहुणे म्हणून ‘क्रीडा’ संस्थेचे माननीय संचालक डॉ. व्ही. के. सिंग उपस्थित होते.
बैठकीस वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,
‘क्रीडा’चे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान
केंद्रांचे प्रमुख, कृषि विभाग, पशुसंवर्धन,
जलसंधारण, रेशीम विभाग, जिल्हा
परिषद यांसह विविध संलग्न विभागांचे वरिष्ठ अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे
प्रतिनिधी आणि प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. राजेश कदम, श्री.
दत्तकुमार कळसाईत, डॉ. जी. रवींद्र चारी, डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद, डॉ. एस. के. बल,
डॉ. मनोरंजन कुमार, डॉ. आनंद गोरे, डॉ. अरविंद पंडागळे, डॉ. मधुकर मोरे, डॉ. देविकांत देशमुख, डॉ. कृष्णा अंभोरे, डॉ. प्रवीण कुमार घुले, डॉ. वसंत सूर्यवंशी, श्री. भानुदास पेंडकर,, डॉ पपीता गौरखेडे, डॉ. बस्वराज भेदे आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांनी शेतकऱ्यांची सेवा करणे, त्यांना उपयुक्त
तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि संकटकाळात त्यांना पाठबळ देणे हे विद्यापीठाचे
प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. त्यांनी अतिवृष्टी, अल्पवृष्टी
आणि बदलत्या हवामानामुळे शेतीसमोर निर्माण होत असलेल्या नव्या आव्हानांकडे लक्ष
वेधले. हवामान बदल हे संकट नसून त्यामध्येही संधी शोधण्याची आवश्यकता असल्याचे
सांगत अतिरिक्त पाण्याचा संचय करून त्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्याचे आवाहन
त्यांनी केले.
ते म्हणाले, शेतकऱ्यांनी
घाबरून न जाता विद्यापीठाने सुचविलेल्या आकस्मिक आराखड्यानुसार शेतीचे नियोजन
करावे. अनेकदा आधुनिक यंत्रसामग्रीची कमतरता असतानाही शेतकरी कष्टपूर्वक शेतीचे
व्यवस्थापन करतात. त्यांच्या अनुभवातून आपल्याला शिकण्यासारखे खूप काही आहे.
‘शेतकरी ते शेतकरी’ तंत्रज्ञान प्रसार ही अत्यंत प्रभावी पद्धत असून त्यातून
आधुनिक तंत्रज्ञानाचा वेगाने प्रसार होऊ शकतो.
यावेळी त्यांनी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या
माननीय श्री. दादा लाड यांच्या कापूस उत्पादन तंत्रज्ञानाचा उल्लेख करत त्यांच्या
कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनीही शेतकऱ्यांसाठी योगदान देण्याची गरज व्यक्त
करत टीका व मूल्यमापन ही सुधारणेची प्रक्रिया असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुढे बोलताना त्यांनी प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांच्या
समस्यांवर आधारित व्यापक बैठका आणि एकात्मिक सभांचे आयोजन करण्याची आवश्यकता
व्यक्त केली. अशा कार्यक्रमांचे आयोजन केवळ नांदेडपुरते मर्यादित न राहता संपूर्ण
मराठवाड्यात व्हावे, असे ते म्हणाले.
एल-निनोसारख्या परिस्थितीवर प्रभावीपणे मात करण्यासाठी कृषी व संलग्न विभागांनी
परस्पर समन्वयातून काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माननीय
कुलगुरूंनी खरीप हंगामात विद्यापीठाचे सर्व शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
जाऊन मार्गदर्शन करतील, अशी ग्वाही देत विद्यापीठ
शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील, असे सांगितले.
‘क्रीडा’ संस्थेचे माननीय संचालक डॉ. व्ही. के. सिंग
यांनी नांदेड जिल्ह्यात सरासरी ९९० मिमी पाऊस पडत असून पाण्याचा कार्यक्षम वापर
करण्यासाठी कोरडवाहू शेती तंत्रज्ञान, शेततळे आणि
जलसंधारण उपायांचा अवलंब आवश्यक असल्याचे सांगितले. तालुकानिहाय जमीन प्रकार आणि
पावसातील बदल लक्षात घेऊन पिके व पीकपद्धती निवडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तसेच
रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय व जीवाणू खतांचा वापर वाढविण्याचे आवाहन
केले.
प्रारंभी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम यांनी स्वागत
करून मराठवाडा हा प्रामुख्याने कोरडवाहू शेतीचा प्रदेश असल्याने विद्यापीठाने
विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.
त्यांनी विद्यापीठाच्या “माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत” या उपक्रमाची माहिती
दिली.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. दत्तकुमार कळसाईत
यांनी कृषी विभागाच्या आकस्मिक नियोजनाची माहिती देताना प्रत्येक तालुक्यात हवामान
आधारित पीक प्रात्यक्षिके राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी विविध
विभागांच्या अधिकाऱ्यांनी आणि शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन
केले.
यावेळी कृषि हवामान तज्ज्ञांनी यंदाच्या पावसाबाबत अंदाज
व्यक्त केला. ‘क्रीडा’चे प्रकल्प समन्वयक डॉ. एस. के. बल यांनी २०२६ मध्ये प्रशांत
महासागरात मध्यम तीव्रतेची एल-निनो स्थिती राहण्याची शक्यता असल्याने हंगामाच्या
मध्यात पावसात खंड पडू शकतो, असे सांगितले.
विद्यापीठाचे मुख्य हवामानशास्त्रज्ञ डॉ. के. के. डाखोरे यांनी जूनमध्ये सरासरी
इतके किंवा त्यापेक्षा कमी, तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा
कमी पावसाची शक्यता वर्तवली.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. जे. व्ही. एन. एस.
प्रसाद आणि डॉ. आनंद गोरे यांनी हवामानानुसार चार टप्प्यांचे पीक नियोजन सुचविले.
पाऊस वेळेवर झाल्यास सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, भुईमूग आदी पिके घ्यावीत. पाऊस उशिरा आल्यास बाजरी, सूर्यफूल,
तूर यांसारख्या कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे.
सोयाबीन + तूर, कापूस + उडीद, बाजरी +
तूर या आंतरपीक पद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच पेरणीपूर्वी
पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, मृद व जलसंधारण,
रुंद वरंबा-सरी पद्धत, कमी कालावधीचे वाण आणि
सेंद्रिय खतांचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.
तसेच डॉ. वसंत सूर्यवंशी, कृषी
विद्यावेता यांनी एल-निनोच्या संकटावर मात करण्यासाठी घरचे बियाणे, बीज उगवण क्षमता तपासणी आणि बीज प्रक्रिया, बीबीफ चा
वापर अशी त्रिसूत्री सांगितली. विविध
तालुक्यातून आलेले शेतकरी श्री. रत्नाकर ढगे,
श्री. अडकीने , श्री, भगवान
इंगोले, श्रीमती सुषमा देव
अशा अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. एम. आर. मोरे यांनी केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील
२५० हून अधिक प्रगतिशील शेतकरी, कृषी व संलग्न विभागांचे
अधिकारी, कृषी विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ तसेच विविध
संशोधन केंद्रांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री. सुरेश खटींग, श्री. व्ही.जे. रिठ्ठे, श्री. अमर राऊत व अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी येथील तसेच कापूस संशोधन केंद्र, केळी संशोधन केंद्र, येथील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
.jpeg)
Need for coordinated efforts among
agriculture and allied departments to overcome the El Niño crisis: Hon’ble Vice
Chancellor Prof. (Dr.) Indra Mani.
Considering the
likelihood of the impact of ‘El Niño’ during the current Kharif season, an
“Awareness Meeting on Contingency Planning in Agriculture” was enthusiastically
organized at Nanded on 25 May 2026 to promote climate-resilient agricultural
planning and adoption of suitable technologies in the farming sector. The
meeting was jointly organized by Vasantrao Naik Marathwada Agricultural
University, Parbhani, and the Central Research Institute for Dryland
Agriculture (CRIDA), Hyderabad, under the Indian Council of Agricultural
Research (ICAR), at the Planning Hall of the District Collector Office, Nanded.
The meeting was chaired by Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani,
while the Director of CRIDA, Dr. V. K. Singh, attended as the chief guest.
Scientists from Vasantrao
Naik Marathwada Krishi Vidyapeeth and KRIDA, heads of Krishi Vigyan Kendras,
senior officials from the Agriculture Department, Animal Husbandry Department,
Watershed Development Department, Sericulture Department, Zilla Parishad,
various allied departments, representatives of non-governmental organizations,
and a large number of progressive farmers attended the meeting.
On this
occasion, Dr. Rajesh Kadam, Shri Dattakumar Kalasait, Dr. G. Ravindra Chari,
Dr. J. V. N. S. Prasad, Dr. S. K. Bal, Dr. Manoranjan Kumar, Dr. Anand Gore,
Dr. Arvind Pandagale, Dr. Madhukar More, Dr. Devikant Deshmukh, Dr. Krishna
Ambhore, Dr. Pravin Kumar Ghule, Dr. Vasant Suryawanshi, Shri Bhanudas Pendkar,
Dr. Papita Gaurkhede, Dr. Basvaraj Bhede and others were present.
In his
presidential address, Hon’ble Vice Chancellor Prof. (Dr.) Indra Mani stated
that the primary objective of the university is to serve farmers, provide them
with useful technologies, and support them during times of crisis. He drew
attention to the new challenges faced by agriculture due to excessive rainfall,
drought-like conditions, and changing climatic patterns. Emphasizing that
climate change should not be viewed only as a crisis but also as an
opportunity, he appealed for the effective management and storage of excess
rainwater.
He said that
farmers should not panic, but instead plan their agricultural activities
according to the contingency plans recommended by the university. He noted that
despite the lack of modern machinery on many occasions, farmers continue to
manage farming operations through hard work and dedication. There is much to
learn from their experiences. He further stated that the “Farmer to Farmer”
technology dissemination approach is highly effective and can accelerate the
spread of modern agricultural technologies.
On this
occasion, he appreciated the work of Padma Shri awardee Respected Shri Dada Lad
and highlighted his contributions in cotton production technology. He also
emphasized that students should contribute towards the welfare of farmers and
remarked that criticism and evaluation are part of the process of improvement.
Further
speaking, he stressed the need to organize comprehensive meetings and
integrated discussions in every agricultural season based on the problems faced
by farmers. Such programmes, he said, should not remain confined only to Nanded
but should be conducted throughout the Marathwada region. He clarified that effective
coordination among agriculture and allied departments is essential to
successfully tackle situations like El Niño. The Hon’ble Vice Chancellor
assured that during the Kharif season, all university scientists would directly
visit farmers’ fields to provide guidance, and reiterated that the university
will always remain committed to the welfare of farmers.
Dr. V. K. Singh,
Hon’ble Director of the “KRIDA” Institute, stated that Nanded district receives
an average annual rainfall of 990 mm, and emphasized the need to adopt dryland
farming technologies, farm ponds, and water conservation measures for efficient
utilization of water resources. He also advised selecting crops and cropping
systems based on taluka-wise soil types and variations in rainfall patterns.
Furthermore, he appealed to farmers to reduce the use of chemical fertilizers
and increase the use of organic and bio-fertilizers.
At the outset,
Associate Dean Dr. Rajesh Kadam welcomed the gathering and stated that since
Marathwada is predominantly a dryland farming region, the technologies
developed by the university would prove highly beneficial for farmers. He also
shared information about the university’s initiative titled “One Day with My
Baliraja (Farmer).”
District
Superintendent Agriculture Officer Mr. Dattakumar Kalasaite, while presenting
the contingency planning of the Agriculture Department, informed that
climate-based crop demonstrations would be conducted in every taluka. Officers
and scientists from various departments also provided useful guidance to the
farmers on the occasion.
During the
program, agrometeorology experts shared rainfall predictions for the current
year. Dr. S. K. Bal, Project Coordinator of “KRIDA,” stated that a moderate El
Niño condition is likely to prevail over the Pacific Ocean in 2026, which may
result in a dry spell during the middle of the cropping season. The
University’s Chief Meteorologist Dr. K. K. Dakhore predicted that rainfall in
June may remain around or below average, while July, August, and September are
likely to receive below-average rainfall.
While guiding
the farmers, Dr. J. V. N. S. Prasad and Dr. Anand Gore suggested a four-stage
crop planning strategy according to weather conditions. If rainfall occurs on
time, crops such as soybean, cotton, pigeon pea, green gram, black gram, and
groundnut should be cultivated. In case of delayed rainfall, priority should be
given to low-water-requirement crops such as pearl millet, sunflower, and
pigeon pea. Farmers were also advised to adopt intercropping systems like
soybean + pigeon pea, cotton + black gram, and pearl millet + pigeon pea. They
further emphasized that sowing should not be undertaken unless adequate
rainfall is received beforehand. Farmers were also advised to adopt soil and
water conservation measures, broad bed and furrow (BBF) method, short-duration
crop varieties, and the use of organic fertilizers.
Dr. Vasant
Suryawanshi, Agricultural Scientist, highlighted a three-point strategy to
overcome the challenges of El Niño, which included the use of farm-saved seeds,
seed germination testing and seed treatment, and adoption of the BBF method.
Progressive farmers from various talukas, including Mr. Ratnakar Dhage, Mr.
Adkine, Mr. Bhagwan Ingole, and Mrs. Sushma Dev, actively participated in the discussion.
The program was
compered by Dr. Papita Gaurkhede, while the vote of thanks was delivered by Dr.
M. R. More. More than 250 progressive farmers from the district, officers from
agriculture and allied departments, scientists from Krishi Vigyan Kendras, and
officers and staff from various research centers attended the program in large
numbers.
For the
successful organization of the program, Mr. Suresh Khating, Mr. V. J. Rithe,
Mr. Amar Raut, and the officers and staff of the Dryland Farming Research Project,
VNMKV, Parbhani, along with officials and employees from the Cotton Research
Centre and Banana Research Centre, made significant efforts.




.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)