Pages

Saturday, June 27, 2026

वनामकृविच्या जिरेवाडी येथील कृषि महाविद्यालय व कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या बांधकाम प्रगतीचा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी घेतला आढावा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामार्फत जिरेवाडी (ता. परळी, जि. बीड) येथे उभारण्यात येत असलेल्या कृषी महाविद्यालय (COA) व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय (COABM) यांच्या बांधकाम कामांची प्रगती तपासण्यासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दि. २६ जून २०२६ रोजी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी करत बांधकामाचा सविस्तर आढावा घेतला.

या पाहणीदरम्यान बांधकामाची सद्यस्थिती, स्तंभ, स्लॅब, आरसीसी संरचना, वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता, सुरक्षिततेच्या उपाययोजना तसेच कामाच्या वेळापत्रकाचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी माननीय कुलगुरूंनी कामाचा वेग आणि गुणवत्ता या दोन्ही बाबींना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे नमूद करत, निर्धारित वेळेत दर्जेदार काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

याप्रसंगी विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिनेश चौहान तसेच उपविद्यापीठ अभियंता श्री. डी. डी. टेकाळे उपस्थित होते. त्यांनी माननीय कुलगुरूंना बांधकामाच्या सद्य प्रगतीची माहिती देत आगामी कालावधीत पूर्ण होणाऱ्या पुढील टप्प्यांची रूपरेषा सादर केली.