डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 125 व्या
जयंती निमित्त चेन्नई येथील ग्लोबल इकॉनॉमीक प्रोग्रेस एन्ड रिसर्च असोशियशन
या संस्थेतर्फे गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्या
प्रा. विशाला पटनम यांना शिक्षण व संशोधन क्षेत्रामध्ये केलेल्या
उत्कृष्ट कार्याबद्दल डॉ. राधाकृष्णन सुवर्ण पदकांनी तर वैयक्तीक मिळविलेल्या
नावलौकीकाबद्दल भारत सेवा रतन सुवर्ण पदकांनी सन्मानीत करण्यात आले. या पुरस्कारांचे
वितरण चेन्नई येथे दिनांक 19 ऑक्टोंबर 2013 रोजी माजी कायदा व न्याय मंत्री के.
वेंकटपथी आणि मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस जगदिसन यांच्या हस्ते कॉन्ट्रीब्युशन
टु इज्युकेशन अन्ड नॅशनल डेव्हलपमेंट याविषयावर आयोजीत 14 व्या राष्ट्रीय
परिसंवादाच्या कार्यक्रमामध्ये करण्यात आले. यानिमित्य गृहविज्ञान महाविद्यालयाच्या
सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे सत्कार करून अभिनंदन
केले.