वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या गृहविज्ञान महाविद्यालयातील अंतिम
वर्षातील सातव्या सत्राचे विद्यार्थी ग्रामीण जीवनशैली अभ्यासण्यासाठी तसेच
गृहविज्ञान या विषयाचे आत्मसात केलेले ज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ग्रामीण
गृहविज्ञान कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत 21 ऑगष्ट 2013 पासून पोखर्णी नृसिंह येथे
कार्यरत होते. या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांनी पाच कुटूंब दत्तक येऊन त्यांचे
सर्वेक्षण करुन त्यांच्या गृहविज्ञानाशी निगडीत गरजांवर आधारीत कार्यक्रमाची
आखणी केली. प्रारंभी पोखर्णी येथील नृसिंह विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
घेऊन गावफेरी काढण्यात आली. या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी संभाषण कौशल्य
व व्यक्तीमत्व विकास, महिलांसाठी गरोदर मातांची व बालकांच्या काळजी कशी घ्यावी
आणि सर्वांगीण विकास याबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. विशाला पटनम यांनी
कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन केले. तसेच गृहविज्ञान तंत्रज्ञानाबाबतचे प्रदर्शन
नृसिंह मंदीर सभागृहामध्ये आयोजीत केले होते. प्रदर्शनाचे उद्घघाटन सरपंच श्री
मदनराव वाघ यांचे हस्ते करण्यात आले होते. प्रदर्शनास पोखर्णी येथील बहूसंख्य
महिला व पुरूषांनी भेट दिली. गृहविज्ञान तंत्रज्ञान जास्तीत जास्त ग्रामीण
महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे मनोगत सरपंच मदनराव वाघ यांनी
याप्रसंगी व्यक्त केली. रावेच्या विद्यार्थ्यांनी ग्राम स्वच्छता अभियान
राबवुन ग्रामपंचायत कार्यालय, गावातील मंदीरे व त्यांचा परिसर स्वच्छ केला.
नाविन्यपूर्ण गृहविज्ञान तंत्रज्ञानाचा अवलंबन करुन पोखर्णी येथील महिलांनी विविध
खाद्यपदार्थ, बांधणी काम, शोभीवंत तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन मांडण्यात
आले. या प्रदर्शनाचे उद्घघाटन डॉ. हेमांगीनी सरंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले
व त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या दोन महिन्याच्या कालावधीत महाविद्यालयाच्या
अन्न व पोषण विभागाच्या प्रमुख डॉ. विजया नलवडे, विस्तार विभाग प्रमुख डॉ.
प्रभा अंतवाल व डॉ. फारुखी फरजाना यांनी महिलांनी विविध तंत्रज्ञानावर मार्गदर्शन
केले. समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगी महिलांनी प्रतिक्रिया देताना
विद्यार्थींनीकडून विविध पाककृती, मानव विकास, वस्त्र अभिकल्पना, कौटूंबिक व्यवस्थापन,
निरोगी रहाण्यासाठी तसेच विविध आजारामध्ये आहाराचे नियोजन इ. बद्दल सखोल माहिती
मिळाली व त्यांच्या ज्ञानात भर पडली असे गृहविज्ञान महाविद्यालय व
विद्यापीठाबाबत गौरवास्पद उद्गगार काढले. संपूर्ण कार्यक्रमांचे नियोजन प्राचार्या
प्रा. विशाला पटनम यांच्या मार्गदर्शनानुसार समन्वयक डॉ. शंकर पूरी व विद्यार्थ्यांनी
रेश्मा मल्लशे, वेदांती मुळे, अनुराधा डोके, शमशाद शेख, संध्या देशमुख, गिता
सामला, स्नेहल कारले आणि मिनाक्षी मगर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच
मदनराव वाघ, उपसरपंच शेषेराव वाघ, नृसिंह मंदीर व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक
सय्यद सर, अंगणवाडी पर्यवेक्षीका यादव मॅडम व त्यांच्या सर्व सहकारी आणि समस्त
गांवक-यांचे सहकार्य लाभले.