Pages

Thursday, October 3, 2013

महात्‍मा गांधी व लाल बहादुर शास्‍त्री यांच्‍या जयंतीप्रित्‍यर्थ विद्यापीठात स्‍पर्धा परिक्षा मार्गदर्शन


     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महात्‍मा गांधी व लाल बहादुर शास्‍त्री यांची जयंती उत्‍साहात साजरी करण्‍यात आली. त्‍यानिमित्‍त कृषि महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या वतीने विद्यार्थ्‍यांसाठी स्‍पर्धा परिक्षेबाबत अतिरिक्‍त पोलीस अधिक्षक श्री प्रणय अशोक मार्गदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास प्राचार्य डॉ.डि बी देवसरकर, प्राचार्य डॉ. उदय खोडके, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी प्रा. महेश देशमुख, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे, श्री दिवाकर काकडे, डॉ धीरज कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री प्रणय अशोक आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, स्‍पर्धा परिक्षात यश संपादन करण्‍यासाठी कठीण परिश्रम करण्‍याची तयारी पाहिजे. ध्‍येय निश्चित करून वेळेचे नियोजन करावे, मुलभुत ज्ञान प्राप्‍त करणे आवश्‍यक आहे. अभ्‍यासात सातत्‍य पाहिजे तसेच मुलाखतीत आपला समाजाप्रती असलेला दृष्टिकोन महत्‍वाचा ठरतो. विद्यार्थ्‍यांनी गांधीजी व शास्‍त्रीजी यांच्‍या वैचारीक प्रेरणा घेउन आचरण करावे. कठीण परिस्थितीत संयमाने वागुन विजय मिळवित आला पाहिजे असे सल्‍लाही त्‍यांनी सांगितले.
      या कार्यक्रमात कार्यक्रमाधिकारी प्रा. रविंद्र शिंदे यांनी स्‍वयंसेवकांना अहिंसा, सत्‍य व शांततेविषयीची शपथ दिली. कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय जाधव यांनी विद्यार्थ्‍यांना शास्‍त्रीजींच्‍या जीवनशैलीची माहिती दिली. तसेच विदयार्थ्‍यानी महात्‍मा गांधी व लाल बहादुर शास्‍त्री यांच्‍या बाबत आपले विचार व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्रा. अनिल कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. महेश देशमुख यांनी केले.
      कार्यक्रमाच्‍या यशस्वितेकरीता राष्ट्रिय सेवा योजनेच्‍या स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका परीश्रम घेतले. कार्यक्रमास 500;600 विद्यार्थ्‍यी उपस्थित होते.