Pages

Wednesday, October 2, 2013

राष्ट्रिय सेवा योजनाच्‍या वतीने शांतता रॅलीचे आयोजन

शांतता रॅलीत सहभागी स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका



वृक्षारोपण करतांना कुलगुरू मा डॉ किशनरावजी गोरे व जिल्‍हाधिकारी मा श्री सचिंन्‍द्र प्रताप सिंह, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्राचार्य डॉ उदय खोडके, डॉ डि बी देवसरकर, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, कार्यक्रम अधिकारी प्रा अनिस कांबळे, प्रा रविंद्र शिंदे, प्रा विजय जाधव आदी 
राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादुर शास्‍त्री यांच्‍या जयंती दिनानिमित्‍य वसंतराव नार्इक कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या राष्ट्रिय सेवा योजनाच्‍या वतीने शांतता रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते. या शांतता रॅलीस कुलगुरू मा डॉ किशनरावजी गोरे व जिल्‍हाधिकारी मा श्री सचिंन्‍द्र प्रताप सिंह यांच्‍या हस्‍ते हिरवा झेंडा दाखवुन सुरवात करण्‍यात आली. या प्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्राचार्य डॉ उदय खोडके, डॉ डि बी देवसरकर, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख उपस्थित होते. रॅलीला संबोधीत करतांना जिल्‍हाधिकारी मा श्री सचिंन्‍द्र प्रताप सिंह म्‍हणाले की, महात्‍मा गांधी व लाल बहाद्दुर शास्‍त्री यांच्‍या जंयत्‍या नुसत्‍या साज-या करू नयेत तर त्‍यांचे विचार आचरणात आणा, कारण गांधीजीनी अहिंसा व सत्‍य ही तत्‍वे स्‍वत: आचरणात आणल्‍याने ते महान होते. सर्व विद्यार्थ्‍यानी त्‍यांचे विचार आचरणात आणावेत. लाल बहादुर शास्‍त्री व गांधीजी हे त्‍यांच्‍या साधेपणामुळे ही परीचित होते. जय जवान जय किसान नारा हा शास्‍त्रीजीनी दिला. कारण त्‍यांना शेतकरी बाधवांचे देशाच्‍या विकासासाठीचे महत्‍व माहीत होते. या प्रसंगी कुलगुरू मा डॉ किशनरावजी गोरे म्‍हणाले की, गांधीजीनी खेडया कडे चला हा नारा दिला, कारण खेडे स्‍वंयपुर्ण झाले तर देश स्‍वयंपुर्ण होईल याची जाणीव त्‍यांना होती.
याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ परीसरात वृक्षारोपण करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा अनिस कांबळे, प्रा रविंद्र शिंदे, प्रा विजय जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली रासेयोचे स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका यांनी परीश्रम घेतले.