कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार यांना विस्तार शिक्षण विभागाच्या वतीने निरोप समारंभात सत्कार करतांना विद्यापीठाचे कुलसचिव श्री का वि पागिरे व विस्तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे |
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या कृषि महाविद्यालयाचे
सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार दि 31 ऑकटोबर 2013 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त विस्तार शिक्षण विभागाच्या वतीने त्यांना निरोप देण्यात
आला. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलसचिव श्री का वि पागिरे, विभाग प्रमुख डॉ बी एम
ठोंबरे, कृषि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ बी आर पवार, डॉ जे व्ही एकाळे, डॉ
पी आर देशमुख, डॉ आर पी कदम, डॉ प्रविण कापसे, प्रा शुभांगी देशमुख, डॉ कांबळे,
श्री सी एस नखाते आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ एन डी पवार यांचा शाल व श्रीफळ
देउन विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे यांनी सत्कार केला. यावेळी डॉ पवार यांनी
मनोगतात म्हणाले कि, सर्वाच्या सहकार्याने विद्यापीठातील सेवेचा कार्यकाल यशस्वीपणे
पुर्ण करू शकलो, विशेषता त्यांच्या कार्यकाळात निम्नस्तर शिक्षणाचे सहयोगी
संचालक पदावर कार्यकाळात कृषि पदवीका सर्व शाळेच्या प्रवेश प्रक्रिया ऑन लाईन
करण्यात आली, ही विद्यापीठाच्या दृष्टिने महत्वाचा निर्णय अमलात आणु शकलो,
यामुळे विद्यार्थींना प्रवेश प्रक्रियेतील अडचणी कमी झाल्या. त्यांच्या
कार्यकाळात सर्व विभागाचे बळकटीकरण व आंतरराष्ट्रिय वसतीगृह व सर्व विद्यार्थ्याचे
वसतीगृहाचे नुतनीकरण व अद्यावतीकरण करण्यात आले. काही काळ त्यांनी विस्तार
शिक्षण संचालक म्हणुनही कार्य केले. विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार
मानले.