Pages

Wednesday, February 12, 2014

राष्ट्रिय सुर्यफूल जर्मप्लाझम प्रक्षेत्र दिन साजरा

राष्‍ट्रीय सुर्यफुल जर्मप्‍लाझम प्रक्षेत्र दिना निमित्‍त आयोजित दोन दिवशीय परिसंवादाच्‍या उदघाटन प्रसंगी अध्‍यक्षीय भाषण करतांना विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर मा डॉ योंगेद्र नेरकरडॉ दत्‍तप्रसाद वासकरडॉ के एस वरप्रसाद, डॉ आर के त्‍यागी,  श्री के एन देशमुख आदी. 
ला‍तूर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्रात सूर्यफुलाच्‍या संग्रहीत केलेल्‍या 2000 जातीची पाहणी करतांना विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व मा डॉ योंगेद्र नेरकर डॉ दत्‍तप्रसाद वासकरडॉ के एस वरप्रसाद,  डॉ आर के त्‍यागी,  श्री के एन देशमुख आदी. 
**************************************************************

लातुर - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर येथील गळीतधान्‍य संशोधन केंद्रहैद्राबाद येथील तेलबिया संशोधन संचालनालय व नवी दिल्‍ली येथील राष्‍ट्रीय पादप आनुवंशिक संसाधन ब्‍यूरो यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने  राष्‍ट्रीय सुर्यफुल जर्मप्‍लाझम प्रक्षेत्र दिना निमित्‍त लातूर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्रात दोन दिवशीय परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले होते.  दि 6 फेब्रवारी कार्यक्रमाचे उदघाटन महत्‍मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे माजी कुलगुरू तथा वनामकृवि, परभणीचे कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. योगेंद्र नेरकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु होते तसेच हैद्राबाद येथील तेलबीया संशोधन संचालनालयाचे प्रकल्‍प संचालक डॉ. के. एस. वरप्रसाद, नवी दिल्‍ली  येथील राष्‍ट्रीय पादप आनुवंशिक संसाधन ब्‍यूरोचे डॉ आर के त्‍यागी, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विभागीय कृषि सहसंचालक श्री के एन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, सुर्यफुल या पिकाखालील लागवडीचे क्षेत्र बरेच कमी झाले असुन सुर्यफुलाचे मुल्‍यवर्धीत पदार्थावर संशोधन होणे गरजेचे आहे. संशोधनाच्‍या आधारे निर्माण केलेल्‍या विद्यापीठाच्‍या अनेक पिकांच्‍या जाती उत्‍तम असुन त्‍याचा शेतकरांच्‍या शेतावरील परिणाम विश्‍लेषणाची आवश्‍यकता आहे.
मा. डॉ. योगेंद्र नेरकर यांनी आपल्‍या भाषणात विविध पिकांच्‍या नवीन वाण निर्मिती संशोधनाबाबत तर डॉ. के. एस. वरप्रसाद व डॉ आर के त्‍यागी यांनी सुर्यफुल संशोधनाची भविष्‍यातील दिशा, यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक संशोधन संचालक डॉ दत्त्‍तप्रसाद वासकर यांनी तर आभार प्रदर्शन गळीत धान्‍य संशोधन केंद्राचे तेलबिया विशेषज्ञ डॉ महा‍रूद्र घोडके यांनी केले.
यानिमित्‍त ला‍तूर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्रात सूर्यफुलाच्‍या संग्रहीत केलेल्‍या 2000 जातीची पाहणी उपस्थितांनी केले. देशपातळीवर सुर्यफुलाच्‍या उत्‍पादकता वाढीसाठी या जातींच्‍या विविध गुणधर्माचा जसे की केवडा रोग प्रतिबंधक, अधिक उत्‍पादकता, तेलाचे अधिक प्रमाण व इतर गुणधर्म शास्‍त्रीय अभ्‍यास सध्‍या सुरू असुन चांगले वाणाची निवड करून त्‍यांची देशातील परिस्थितीतील स्थिरता व सुर्यफुलाचे मुल्‍यवर्धीत पदार्थ निर्मिती यावरील संशोधनावर भविष्‍यात भर देण्‍याचे या परिसंवादात निश्चित करण्‍यात आले.
परिसंवादात देशातील सुमारे 60 शास्‍त्रज्ञांनी सहभाग नोंदविला. गळीत धान्‍य संशोधन केंद्रातील सुर्यफुलावरील केवडा रोगाच्‍या नर्सरीतील सुक्ष्‍मसिंचन यंत्रणेचे उदघाटन तसेच विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित तंत्र सुधारित सुर्यफुल लागवडीचे या पुस्‍तकाचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व डॉ महारूद्र घोडके यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ नरेशकुमार जायेवार, डॉ अमोल मिसाळ, डॉ एस पी शिरसीकर, श्री एस एन गिरी, श्री आर टी चव्‍हाण, श्री व्‍ही बी जगाले आणि श्री सुधीर सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.