Pages

Saturday, February 7, 2015

नृसिंह पौखर्णी येथे वनामकृविच्‍या ‘उमेद’ उपक्रमातंर्गत कार्यक्रम संपन्‍न

नृसिंह पौखर्णी येथे उमेद उपक्रमातंर्गत शेतक-यांना मार्गदर्शन करतांना डॉ आनंद गोर, याप्रसंगी विभाग प्रमुख डॉ प्रभा अंतवाड, तालुका कृषि अधिकारी श्री गिरी, मुख्‍याध्‍यापक श्री होरगुळे आदी.
परभणी : मराठवाडयात कमी पर्जन्‍यमानामुळे शेतमालाचे अपेक्षित उत्‍पादन न मिळाल्‍याने शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. शेतक-यांनी नाऊमेद न होता प्राप्‍त परिस्थितीला सामोरे जाण्‍यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने उमेदउपक्रम कुलगुरु मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या संकल्‍पनेने विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात असुन याउपक्रमातंर्गत गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने दि ५ फेब्रुवारी रोजी नृसिंह पोखर्णी येथे कार्यक्रम घेण्‍यात आला. कार्यक्रमास कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ आनंद गोरे, विभाग प्रमुख डॉ प्रभा अंतवाल, मुख्‍याध्‍यापक श्री होरगुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ आनंद गोरे यांनी कृषि तंत्रज्ञान व समुहशेती यावर शेतक-यांना मार्गदर्शन करून शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या, त्‍यांची कारणे व उपाय याबाबींची चर्चा केली तर तालुका कृषि अधिकारी श्री गिरी यांनीही शेतक-यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमांतर्गत शाळेचे मुख्‍याध्‍यापक श्री होरगुळे व इतर शिक्षकांचे सहकार्याने शाळाच्‍या व गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍याची प्रभातफेरी काढण्‍यात आली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ प्रभा अंतवाल यांनी केले तर आभार प्रदर्शन चित्रा बेल्‍लुरकर यांनी केले. कार्यक्रमास शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थिती होते.
उमेद उपक्रमांतगर्त काढण्‍यात आलेली प्रभातफेरी