Pages

Tuesday, April 26, 2016

अनुभवातुन शिक्षण कार्यक्रमांतर्गत मौजे धोंडी येथे आळंबी उत्पादनाबाबत मार्गदर्शन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि वि़द्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या अनुभव आधारित शिक्षण कार्यक्रमातंर्गत आंळबी उत्‍पादन केंद्राच्‍या वतीने दिनांक 22 एप्रिल रोजी मौजे धोंडी येथे आळंबी उत्‍पादनाबाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सरपंच श्री बाळासाहेब शिंदे हे होते तर गावातील प्रतिष्‍ठीत नागरिक श्री प्रभाकरराव बुचाले हे प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थित होते. कार्यक्रमात आंळबीचे उत्‍पादन तंत्रज्ञान, पोषणमुल्‍य व त्‍याचे आहारातील महत्‍व आकाश पी व स्‍वाती कांगणे यांनी माहिती सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुराधा बुचाले हिने तर आभार प्रदर्शन विजय घाटोळ यांनी केले. कार्यक्रमास गावकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. ेंद्राच्‍या ्गत  अनुभव  तर्गात कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ के टी आपेट यांच्‍या मार्गदर्शनाखाली अविनाश दहातोंडे, प्रशांत गिते, अरूणकुमार कठाळे, सुरेश चौरे, रत्‍नप्रकाश लोखंडे, सुमित तुमोड, सुभाष इरतकर, ज्ञानेश्‍वर सुरसेटवाड, जगन्‍नाथ निकम, कल्‍पना राठोड, नेहा गरूड, अश्विनी जगताप, जयश्री अंभोरे, जॉन के पी, योगेंद्र बनसोड, भारत खेलबाडे, मुकेश मिना, गोरख देवरे, अतुल्‍या नायर, श्रीलक्ष्‍मी, माधव पवार, अजित गावडे, गजानन शिंदे, बालाजी बोयेवार, प्रमोद पुंडगे, यशवंत देवरे आदींनी परिश्रम घेतले.