Pages

Friday, April 29, 2016

धर्मापुरी येथे शेतकरी महिला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालय व कृषि तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा (आत्‍मा) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने धर्मापुरी येथे महिला शेतकरी सक्षमीकरण कार्यशाळाचे नुकतेच आयोजन करण्‍यात आले होते. या दोन दिवसीय कार्यशाळेत महिला विकास व जबाबदा-या, मानसिक स्‍वास्‍थाची जपवणुक, बालविकास या विषयांवर मार्गदर्शन करण्‍यात आले. शेतकरी महिलांचे काबाडकष्‍ट कमी करण्‍याचे तंत्रज्ञान, उद्योजकता विकासाकरिता कपडयावरील बांधणीकाम, हस्‍तकलेच्‍या कलाकृती आदी विषयावरील कार्यानुभवातुन प्रशिक्षण देण्‍यात आले. यावेळी कार्यशाळेत उपयुक्‍त ज्ञान कौशल्‍य प्राप्‍त झाल्‍याची प्रतिक्रिया सहभागी महिलांनी व्‍यक्‍त केली. कार्यशाळेत गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा विशाला पटनम, प्रा निता गायकवाड, संगीता नाईक, संध्‍या अदमनकर आदी साधनव्‍यक्‍तींनी मार्गदर्शन केले. कार्यशाळे यशस्‍वीतेसाठी प्राचार्या प्रा विशाला पटनम यांच्‍या मार्गदर्शनाखाली मनिषा क-हाळे, संगिता नाईक आदीं परिश्रम घेतले तर होमगार्डचे जिल्‍हा समादेशक डॉ. संजय टाकळकर, सरपंचा श्रीमती शारदाताई कदम, उपसरपंच श्री धाराजी उगले आदीसह गावकरी मंडळीचे सहकार्य लाभले.