Pages

Wednesday, June 22, 2016

कृषिदुतांनी वृक्ष लागवडीचा संकल्‍प करावा......... प्राचार्य डॉ डि एन गोखले

कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या उद्बोधन वर्गात मार्गदर्शन

पर्यावरण संतुलनात झाडांचा मोठी भुमिका असुन ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन कृषि महाविद्यालयाच्‍या कृषिदुतांनी वृक्षलागवडीचा संकल्‍प करून येणा-या कृषीदिनी वृक्षलागवडीत आपले श्रमदान द्यावे, सा सल्‍ला प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) असतो, सदरिल कार्यक्रम राबविण्‍यासाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन दिनांक २१ जुन करण्‍यात आले होते, त्‍या प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर रावे समन्‍वयक डॉ राकेश आहिरे, जल व्‍यवस्‍थापन संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. ए. एस. कडाळे, विषयतज्ञ डॉ. के. डि. नवगिरे, प्रा. डि. एम. नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

   प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले पुढे म्‍हणाले की, कृषि महाविद्यालयातील कृषिदुतांनी ग्रामीण कृषि कार्यानुभवाच्‍या माध्‍यमातुन ग्रामीण जीवनपध्‍दतीचा अभ्‍यास करावा तसेच विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहचवावे. 

   कार्यक्रमात विषयतज्ञ डॉ. के. डि. नवगिरे, प्रा. डि. एम. नाईक प्रा. बी. पी. सावंत, प्रा. बी. एस. कदम, प्रा. एस. आर. नागरगोजे, डॉ. अनिल धमक, प्रा.. बी. बांगडे, प्रा. विशाल अवसरमल, प्रा. डि. व्‍ही. बैनवाड यांनी विद्यार्थ्‍यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक रावे समन्‍वयक डॉ. आर. डि. आहिरे यांनी केले तर सुत्रसंचालन रावे प्रभारी अधिकारी डॉ. पी. एस. कापसे यांनी केले. कार्यक्रमास डॉ. जयश्री एकाळे, प्रा. मेधा सुर्यवंशी, प्रा. पी. एच. गौरखेडे, डॉ. एस. एस. मोरे आदीसह कृषिदुत व कृषिकन्‍या मोठया संख्‍येने उपस्थित होते. कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) असुन या सत्रात विद्यार्थी प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या शेती कसण्‍याचे तंत्र व ग्रामीण जीवनपध्‍दतीचा अभ्‍यास करतात. सदरिल सत्रात यावर्षी महाविद्यालयाचे १८० विद्यार्थ्‍यी कृषिदुत व कृषिकन्‍या म्‍हणुन पुढील पंधरा आठवडे परभणी तालुक्‍यातील निवडक दहा गांवात कार्य करणार आहेत.