Pages

Monday, June 27, 2016

गृह विज्ञान महाविद्यालयात अंगणवाडयातील बाल शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने परभणी जिल्हयातील टाकळी कुंभकर्ण येथील अंगणवाडयांचा बाल शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी दिनांक ९ ते २३ जुन दरम्‍यान पंधरा दिवसीय अनुभवमय प्रशिक्षिण आयोजीत करण्‍यात आले होते. सदरिल प्रशिक्षण उपविभागीय अधिकारी श्री. सुभाश शिंदे, गृह विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. विशाला पटनम व जिल्‍हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. साहेबराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागांतर्गत असलेल्या एलपीपी स्कूलमध्ये संपन्‍न झाले. जिल्‍हा परिषदेचे एकात्मिक बाल विकास योजनेेतंर्गत प्रायोगिक तत्वावर मौजे टाकळी कुंभकर्ण येथून या प्रशिक्षणाची सुरुवात केली. सदरील प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रम विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्‍या प्रमुख उपस्थितीत दिनांक २३ जुन रोजी पार पडला. बालवयातच बालकांमध्ये उत्तम संस्कार तथा शिक्षणाची बिजे रुजवल्या गेल्यास निश्चितच त्यांची चांगली फळे भविष्‍यात सुजाण नागरिकाच्या रुपात दिसून येतात, असे मत त्यांनी यावेळी व्‍यक्‍त करून सदरिल प्रशिक्षण प्राप्‍त केलेल्‍या सहभागी प्रशिक्षणार्थी बालशिक्षणाची कोणतीही आव्हाने पेलू काल असा विश्वासही त्यांनी प्रगट केला. प्रशिक्षण यस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना व साधनव्यक्तींना त्यांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्रे प्रदान करण्‍यात आली. उपलब्ध संसाधनांचा उपयोग करुन ग्रामीण बालकांचा उच्चतम सर्वांगीण विकास घडवता येतो याबाबतचे वास्तववादी प्रभावी व सखोल प्रशिक्षण आंनददायी वातावरणात ज्ञान व कौल्यात वृध्दि झाल्‍याची भावना प्रशिक्षणार्थीनी यावेळी व्यक्त केले. बाल विकास शास्त्रज्ञ तथा प्राचार्या प्रा. विशाला पटनम या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका असून त्यांनी या प्रशिक्षणाचा संपूर्ण आराखडा तयार केला. या प्रशिक्षणासाठी प्रा. विशाला पटनम, डॉ. जया बंगाळे, डॉ. वीणा भालेराव, शिक्षिका वर्षा, अभिलाशा, वैषाली व श्रुती यांनी साधनव्यक्ती म्हणून त्यांची कार्ये पार पाडली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. जया बंगाळे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक, एलपीपी स्कूल कर्मचारी यांची उपस्थिती होती.