वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या
उद्यानविद्या महाविद्यालयातील सह्योगी प्राध्यापक डॉ गजेंद्र जगताप यांची ऑस्ट्रेलियन
सरकारच्या आंतरराष्ट्रीय इंडेव्हर पोस्ट डॉक्टरेट फेलोशिपसाठी निवड झाली असुन
या फेलोशिपसाठी सन २०१६ साठी निवड झालेले ते राज्यातील एकमेव कृषी शास्त्रज्ञ आहेत. या
फेलोशिपच्या माध्यमातुन डॉ. गजेंद्र जगताप हे ऑस्ट्रेलियातील रॉयल मेलबॉर्न
इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी या विद्यापीठात ९ ऑगस्ट २०१६ ते ८ फेब्रुवारी २०१७
या सहा महिन्याच्या कालावधीत प्लॅन्ट बायोटेक्नोलॉजी प्रयोगशाळेत डॉ.
नितीन मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सीट्रस बायोसेक्युरीटी या विषयावर अद्यावत
संशोधन करणार आहेत. या संशोधनासाठी लागणारा सर्व खर्च ऑस्ट्रेलियन सरकार करणार असुन ही फेलोशिप मिळवण्यासाठी कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु व शिक्षण
संचालक डॉ अशोक ढवण यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन डॉ गजेंद्र जगताप यांना लाभले. डॉ गजेंद्र जगताप यांचे सदरिल फेलोशिपसाठीच्या निवडीबाबत माननीय कुलगुरू, शिक्षण संचालक आदीसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांनी अभिनंदन केले.