Pages

Wednesday, July 27, 2016

मौजे सायळा (ख) येथे कृषिदूतांमार्फत लसीकरण मोहीम संपन्न

परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांचा उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीक सोयाबीन संशोधन प्रकल्प येथे कार्यरत असलेल्‍या परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांनी मौज सायळा (ख) येथे दि. २६ जुलै रोजी सार्वजनिक पशु लसीकरण मोहीम आयोजित केली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले हे उपस्थित होते तर सरपंच श्री. भगवान खटिंग, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ओमप्रकाश माने, डॉ. ए. टी. शिंदे, प्रकल्प प्रभारी अधिकारी डॉ. एस. पी. म्हेत्रे, डॉ. डी. जी. मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले यांनी गावातील पशुपालकांना जनावरांचे स्‍वास्‍थ्‍य चांगले ठेवण्‍यासाठी जनावरांचे नियमीत लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. डॉ. ए. टी. शिंदे यांनी पशुंच्या लसीकरणाचे महत्व विशद केले तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ओमप्रकाश माने यांनी पशुंचे लाळ व खुरकत रोगांबाबत माहिती देऊन जनावरांचे लसीकरण केले. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एल. बडगुजर यांनी केले. सुत्रसंचालन कृषिदूत विष्णू डोंगरे यांनी तर विजय धोत्रे यांनी आभार मानले. लसीकरण मोहीमे अंतर्गत गावातील दोनशे पेक्षा जास्‍त जनावरांचे लसीकरण करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वतीसाठी कृषिदूत म्हणून परमेश्वर गायकवाड, समाधान देवकाते, संजय बोंगाने, राम देशमुख, शुभम गोद्रे, अक्षय गार्डी व संकेत डावरे यांनी परिश्रम घेतले.