Pages

Wednesday, September 7, 2016

कृषी शिक्षणात मुल्‍य शिक्षणाचा अंंतर्भाव करावा लागेल......शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण

गणेशोत्‍सव २०१६ आयोजित व्‍याख्‍यानामालेचे गुंफले पहिले पुष्‍प
समाज निर्मितीत शिक्षकाचा मोठा वाटा असुन विद्यार्थ्‍यीचे व्‍यक्‍तीमत्‍व घडतांना त्‍याच्‍यावर शिक्षकांचे संस्‍कार होत असतात, विद्यार्थ्‍यी हे सर्व गुरूचे संचित असतात. आज शिक्षकांची जबाबदारी वाढली असुन विद्यार्थ्‍यीच्‍या अनेक अपेक्षा आहेत. आजचे शिक्षण व्‍यवस्‍थेत भौतिकसुखाच्‍या दृष्‍टीने विद्यार्थ्‍यांना अध्‍यायन केले जाते, कृषी शिक्षणात आज मुल्‍य शिक्षणाचा अतंर्भाव करावा लागेल, असे मत शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या वतीने गणेशोत्‍सव २०१६ निमित्‍त व्‍यक्‍तीमत्‍व विकासासाठी व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करण्‍यात आले असुन शिक्षण दिनाचे औजित्‍य साधुन दिनांक ६ सप्‍टेबर रोजी आदर्श शिक्षक व आजचे विद्यार्थी या विषयावर शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांच्‍या भाषणाने व्‍याख्‍यानमालेचे पहिले पुष्‍प गुंफण्‍यात आले. व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ उद्य खोडके, विभाग प्रमुख डॉ डि एन धुतराज, डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ आर डी आहीरे, प्रा एन जे लाड, गणेशोत्‍सव अध्‍यक्ष प्रविण पोपळघट, उपाध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, सर्वपल्‍ली राधाकृष्‍णन यांनी अनेक भुमिकेतुन समाजास योगदान दिले, परंतु शिक्षक म्‍हणुन त्‍यांचे मोठे योगदान असुन त्‍यांचा जन्‍मदिन भारतात शिक्षक दिन म्‍हणुन साजरा करतो. विविध जयंती, उत्‍सव, सण आदीं साजरे करतांना विचाराच्‍या जागर करण्‍याची संधी असते, यात विद्यार्थ्‍यी घडत असतात, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्राचार्य डॉ विलास पाटील, डॉ आनंद कार्ले, प्रा विजय जाधव आदीसह ज्ञानेश्‍वर शिंदे, शुभम गोदरे, निखिल मुळे, लक्ष्‍मण कदम, पंकज घोडके, प्रीती गायकुळे विद्यार्थ्‍यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्‍यांनी गुरूजनवर्गांचा सत्‍कार केला. शाम थोरे यांनी स्‍वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्‍ता भोसले यांनी केले तर आभार सदानंद देवकते यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.