Pages

Thursday, February 16, 2017

छत्रपतीच्‍या स्‍वराज्‍यात जलसंधारणाचे चांगले नियोजन होते..... अॅड. गणेश हलकारे

वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयात छत्रपती शिवजयंती उत्‍सव २०१७ चे आयोजन
छत्रपतींच्‍या स्‍वराज्‍यात शेतक-यांच्‍या हिताचे रक्षण केले जात असे. शिवरायाच्‍या राज्‍यात कोडरवाहु शेतीचा मोठा भाग होता, जलसंधारणाचे चांगले नियोजन केले गेले होते. आजच्‍या युवकांनी शिवचरित्राचा तटस्‍थ अभ्‍यास करणे गरजेचे आहे. आज प्रगत तंत्रज्ञानाच्‍या आधारे शेतकरी शेतमालाचे चांगले उत्‍पादन घेत आहेत, शेतकरी उत्‍तम उत्‍पादक आहे, परंतु शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढले नाही. कारण शेतकरी उत्‍तम व्‍यापारी होऊ शकला नाही. उत्‍पादन खर्चावर आधारी शेतमालाला भाव मिळल्‍याशिवाय ही स्थिती बदलणार नाही, शेतीला उद्योगाचा दर्जा देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अमरावतील येथील प्रख्‍यात व्‍यक्‍ते अॅड. गणेश हलकारे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक १५ फेब्रुवारी रोजी आयोजित व्‍याख्‍यानाच्‍या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते तर व्‍यासपीठावर सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर, प्राचार्य डॉ ए एस कदम, विभाग प्रमुख डॉ टि बी तांबे, डॉ आर डि आहिरे, डॉ ए एस कार्ले, विद्यार्थी प्रतिनिधी अमोल पवार, रवि सुरवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अॅड. गणेश हलकारे पुढे म्‍हणाले की, शिवाजी राजे उत्‍तम प्रशासक, व्‍यवस्‍थापक, रणधुरंदर, मुत्‍सद्दी होते. त्‍यांच्‍या स्‍वराज्‍यात जातीधर्मास थारा नव्‍हता. सर्व जातीधर्माचे लोक त्‍यांच्‍या प्रशासनात व सैन्‍यात होते. आजही त्‍यांच्‍या विचारांची गरज असुन जातीभेद मानणारा देश कधीही महासत्‍ता होऊ शकत नाही.
अध्‍यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी राजे शिवाजी यांचे शेतक-यांच्‍या कल्‍याणाकडे आपल्‍या स्‍वराज्‍यात विशेष लक्ष होते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ आर डि आहिरे यांनी केले तर प्रमुख व्‍यक्‍त्‍याचा परिचय डॉ मेधा सुर्यवंशी हिने करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ ए एस कार्ले यांनी तर आभार स्‍वप्‍नील भोसले यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्‍यापक व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.