Pages

Thursday, February 23, 2017

वनामकृवित लिंबूवर्गीय फळपिकांबाबत चार दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या लिंबूवर्गीय फळपिकांवर मराठवाडाकरिता तत्रंज्ञान अभियांनातर्गत चार दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 07 ते 10 मार्च दरम्‍यान मोसंबी, संत्रा व लिंबू उत्‍पादक बागायतदारांकरीता आयोजित करण्‍यात आला आहे. प्रशिक्षणात रोपवाटीका व्‍यवस्‍थापन, उत्‍पादन, पिक संरक्षण व काढणी पश्‍चात तंत्रज्ञान आदीबाबत मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीची निवासाची व भोजनाची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असून प्रशिक्षणाकरीता परभणी येथे येण्‍याचा व जाण्‍याचा खर्च प्रशिक्षणार्थीना स्‍वत: करावा लागेल. स‍दरील प्रशिक्षण विदयापीठ प्रशासकीय इमारती समोरील शेतकरी भवन येथे आयोजीत करण्‍यात आले आहे. तरी मराठवाडयातील इच्‍छूक लिंबूवर्गीय फळ उत्‍पादक बागायतदारांनी दिनांक 1 मार्च पर्यंत टिएमसीचे प्रभारी अधिकारी प्रा आर एस बोरडे (भ्रमणध्‍वनी क्र 7588156217 किंवा दुरध्‍वनी क्रमांक 02425-220685) व विस्‍तार शिक्षण संचालनालयाशी संपर्क साधुन आपली नावनोंदणी करावी. प्रथम येणा-यास प्राधान्‍य देण्‍यात येणार असून मर्यादीत साधरणत: 40 ते 50 बागायदारांना प्रशिक्षण देण्‍यात येईल तसेच बागायदारांच्‍या प्रतिसादानुसार सदरील प्रशिक्षण पुन्‍हा एकदा आयोजीत करण्‍यात येईल, असे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी कळविले आहे.