Pages

Friday, March 3, 2017

कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थीची शैक्षणिक सहलीचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, औद्योगिक, संशोधनात्मक व विपणन व्यवस्थापन आदींबाबतचे ज्ञान वृद्धिंगत होण्यादृष्‍टीने शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून शैक्षणिक सहलीचे जालना, औरंगाबाद व जळगाव जिल्‍हयातील विविध प्रक्षेत्र व संस्‍थांना भेट देण्‍यासाठी दिनांक 3 ते 4 मार्च रोजी आयोजण करण्‍यात आले आहे. सदरिल विद्यार्थ्यांच्‍या गटास संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. अशोक ढवन, प्राचार्य डॉ. अशोक कडाळे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी आदींनी शुभेच्‍छा दिल्‍या. जालना जिल्ह्यातील शिवणी या गावातील पाणलोटक्षेत्र, औरंगाबाद येथील पाणी व जल व्यवस्थापन केंद्र, पैठण येथील नाथसागर प्रकल्प, जळगाव येथील जैन उद्योग समूह आदींना भेटी देण्‍यात येणार आहेत. शैक्षणिक सहलीच्‍या माध्‍यमातुन सहलीचा आनंद घेऊन विविध संस्‍थेचे व प्रक्षेत्राचे कार्य, कौशल्‍य व ज्ञान अवगत करण्‍याची संधी महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यीना मिळते, असे मत संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. अशोक ढवन यांनी यावेळी व्‍यक्‍त केले. सदरिल शैक्षणिक सहलीचे नियोजन प्राचार्य डॉ. अशोक कडाळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रा. भास्कर भुईभार, प्रा. मधुकर मोरे, प्रा. सुभाष विखे, प्रा. दत्तात्रय पाटील, श्री. बी.एन.येरावार, श्री. मारोतराव कटारे, जितेंद्र खिल्लारे आदींनी केले.