Pages

Tuesday, May 22, 2018

वनामकृवित कौशल्‍य विकास निवासी प्रशिक्षण संपन्‍न



परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठांतील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि कृषि तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा (आत्‍मा), परभणी यांच्‍या संयुक्‍त विदयमाने ग्रामीण युवकांकरिता सहा दिवसीय कौशल्‍या विकास निवासी प्रशिक्षण दिनांक १४ ते १९ मे दरम्‍यान संपन्‍न झाले. यात रेशीम उदयोगआणि कृषि उत्‍पादन प्रक्रिया व विपणन या दोन विषयावरील प्रशिक्षणात प्रत्‍येकी एकूण ३० ग्रामीण युवकांनी सहभाग नोदंविला. सदरिल प्रशिक्षणात प्रात्‍याक्षिकाव्‍दारे कौशल्‍यवृध्‍दी विशेष भर देण्‍यात आला होता.
रेशीम उदयोग या विषयावर प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे, वरीष्‍ठ संशोधन सहायक प्रा. चौंडेकर, श्री. ए.ए. करंडे, डॉ. आरती वाकुरे यांनी मार्गदर्शन करून शासनाच्‍या विविध योजनांची माहिती दिली. श्री. पी. एम. जंगम यांनी नाबार्ड, तर रुपाली कानगुडे, प्रकल्‍प अधिकारी यांनी जिल्‍हा उदयोग केंद्राचे विविध उपक्रम यावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. एस. जी. पुरी यांनी उदयोजगता विकास व संभाषण कौशल्‍य याबाबत मार्गदर्शन केले.
कृषि उत्‍पादनांची प्रक्रिया व विपणन यावर अन्‍नतंत्र महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. सावते, प्रा. दिलीप मोरे, डॉ. व्‍ही. एस. पवार, डॉ. के. एस. गाडे, डॉ. बी. एस. आगरकर, डॉ. बी. ए. जाधव, प्रा. पी .यु. घाटगे, प्रा. ए. ए. जोशी, प्रा. एस. के. सदावर्ते, प्रा. आर. बी. क्षिरसागर, यांनी मार्गदर्शन करुन सोया स्‍नॅक्‍स, भाजीपाला फळे निर्जलीकरण, बेकरी पदार्थ, दुग्‍धजन्‍य पदार्थ, हळद प्रक्रिया यावर यांचे प्रात्‍याक्षिके दाखवुन शेतक-यांकडून सदरिल पदार्थ करुन घेतले.
समारोपात कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले हे होते तर मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, आत्‍मा प्रकल्‍प संचालक श्री. के. आर. सराफ, विस्‍तार कृषि विदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदाण करण्‍यात आले.
अध्‍यक्षीय भाषणात डॉ. प्रदिप इंगोले यांनी प्रशिक्षणातील अवगत केलेले ज्ञान व कौशल्‍य प्रत्‍यक्षात अमलात आणण्‍याचे आव्‍हान केले. सहभागी शेतकरी सादुजी मिसाळ व विठ्ठल सुरवसे यानी प्रशिक्षणाबाबत समाधान व्‍यक्‍त केले. प्रास्‍ताविक डॉ. यु. एन. आळसे यांनी केले. प्रशिक्षणाच्‍या आयोजनासाठी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले आणि विस्‍तार कृषि विदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ. एस. जी. पुरी यांनी प्रशिक्षण समन्‍वयक म्‍हणून कार्य केले.