Pages

Tuesday, May 29, 2018

‘जॉईट अॅग्रेस्को’ मध्ये वनामकृविच्या 3 नवीन वाण, 4 कृषि यंत्र आणि 28 पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित शिफारशीनां मान्यता

दापोली येथील डॉबाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात 46 वी संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची बैठक संपन्न

महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहचविण्यासाठी महत्वाचा टप्पा मानल्या जाणा-या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची 46 वी बैठक दिनांक 23 ते 25 मे रोजी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात संपन्न झाली. या बैठकीमध्ये परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या खरीप ज्वारी, देशी कापुस, चिंच आदी पिकांचे प्रत्येकी एक नवीन वाण, चार कृषि यंत्र आणि 28 पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित शिफारशीनां मान्यता देण्यात आली, अशी माहिती संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी दिली.

त्यांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे.
() प्रसारित नवीन वाण
1. खरीप ज्वारीचापरभणी शक्ती“ (पीव्हीके-1009) वाण
हा वाण राज्यातील खरीप ज्वारी पिकविणा-या क्षेत्रासाठी लागवडीस प्रसारीत करण्याची मान्यता देण्यात आली. हा वाण अधिक उत्पादन देणारा, लोह जस्ताचे अधिक प्रमाण असलेला असुन दाण्यावरील काळी बुरशी, खोडमाशी खोडकिडीस मध्यम सहनशील आहे.  
2. देशी कापसाचापीए–740वाण
हा वाण मराठवाडा विभागात लागवडीकरीता प्रसारीत करण्याची शिफारस करण्यात आली. हा वाण धाग्याचे सरस गुणधर्म असलेला असुन रसशोषण करणा-या किडी, जिवाणूजन्य करपा, अल्र्टनेरिया दहिया रोगास सहनशील आहे.
3. चिंच फळपिकाचा शिवाईवाण
हा वाण राज्यातील कोरडवाहू विभागासाठी प्रसारित करण्याची मान्यता देण्यात आली, हा वाण नियमीत फळे देणारा असुन अधिक उत्पादनक्षम आहे.

() नवीन कृषि यंत्रे :
1. एक बैलचलित टोकण यंत्र
वनामकृवि एक बैलचलित टोकन यंत्राची प्रसारण करण्यासाठी शिफारसीस मान्यता देण्यात आली. या टोकण यंत्राची क्षमता प्रती तास 0.189 हेक्टर एवढी असुन लहान अल्पभुधारक शेतक-यासाठी उपयुक्त आहे. हे यंत्र पिकामधील पेरणीसाठी / रिलेक्रॉपीगसाठी उपयुक्त आहे.
2. बैलचलित सरीयंत्रासहित तीन पासेचे कोळपे
वनामकृवि बैलचलित तीन पासेचे कोळपे सरीसह रुंद वरंबा सरीवरील पिकातील आंतरमशागत करण्यासाठी प्रसारीत करण्याची शिफारस मान्य करण्यात आली. हे कोळपे बीबीएफने पेरणी केलेल्या जमिनीत कोळपणी सरी तयार करण्यासाठी उपयुक्त असुन याची क्षेत्रीय क्षमता प्रती तास 0.20 हेक्टर आहे तर गवत काढण्याची क्षमता 84 टक्के आहे. यामुळे मजुरीवरील खर्चात 60-70 टक्के बचत होते.
3. ट्रॅक्टरचलीत रुंदसरी वरंबा टोकण यंत्र तणनाशक फवारणी यंत्र
वनामकृवि ट्रॅक्टरचलीत पाच फणीच्या बीबीएफ टोकन यंत्राची पेरणी तणनाशक फवारणी करण्यासाठी प्रसारीत करण्याची शिफारशीस मान्यता देण्यात आली. या यंत्राने रुंद सरी वरंब्या वर टोकण पद्धतीने पेरणी करता येते. सोबतच तणनाशकाची (उगवणी) फवारणी करता येते. 45 अश्वशक्ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाच ओळी बी खत पेरणी करता येते. या यंत्राची सोयाबीनसाठी प्रती तास 0.49 हेक्टर एवढी क्षमता आहे.
4. बैलचलित सौर ऊर्जावर चालणारे तणनाशक फवारणी यंत्र
वनामकृवि बैलचलीत सौर फवारणी यंत्रांची तणनाशके फवारणी करण्याकरीता प्रसारीत करण्याची शिफारस मान्य करण्यात आली. हे सौर ऊर्जावर चालत असल्याने प्रदुषणरहित फवारणी यंत्र असुन एकूण 12 नोझल्स असून एकत्रित ब्रुम प्रवाह 7.0 ते 9 लि/मि एवढा आहे. फवारणीसाठी लागणारे मनुष्यबळ, वेळ, पैशाची बचत होते. या यंत्रीची क्षमता प्रती तास 1.13 हेक्टर तर ओढण शक्ती 34.14 किलो एवढी आहे.

यासह पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारीत 28 मान्यता देण्यात आली, अशी माहिती संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी दिली. 

पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारीत 28 शिफारशीसाठी क्लिक करा

पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारीत 28 शिफारशी पुढील प्रमाणे


1. सोयाबीन पिकाचे अधिक उत्पादन, जास्त आर्थिक नफा जमिनीचे गुणधर्म सुधारण्यासाठी सुडोमोना स्ट्रायटा ह्रा जस्त विरघविणा-या द्रवरुप जिवाणू संवर्धनाची 10 मिली लिटर प्रती 10 किलो प्रमाणे बीजप्रक्रिया शिफारशीत खत मात्रेसह (30:60:30 नत्र, स्फुरद पालाश किलो प्रती हेक्टर) रायझोबियम बीजप्रक्रियेसह 30 किलो जस्त सल्फेट देण्याची शिफारस मान्य करण्यात आली.

2. मराठवाडा विभागातील उशिरा पेरण्यात (25 + 5 जुलै दरम्यान) आलेल्या खरीप बाजरीचे अधिक उत्पादन घेण्यासाठी 5 टन शेणखत सोबतच शिफारस खत मात्रा (60:30:30 नत्र, स्फुरद पालाश किलो प्रती हेक्टरी) 19:19:19 या विद्राव्य खताची मात्रा 0.5 टक्के (50 ग्रॅम/10 लीटर पाण्यात) ची फवारणी पेरणीनंतर 20-25 दिवसांनी करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

3. मराठवाडा विभागातील मध्यम ते खोल काळया जमिनीत बागायती बीटी कपाशीमध्ये लाल्याच्या व्यवस्थापनासाठी, प्रती हेक्टरी अधिक उत्पादन आणि निव्वळ नफा मिळविण्यासाठी 125 टक्के शिफारशीत रासायनिक खतांची मात्रा (100:50:50 नत्र : स्फुरद : पालाश किलो / हेक्टर) ठिबक सिंचनातून देवून सुक्ष्ममुलद्रव्ये ग्रेड-2 (0.5 टक्के) पोटॅशियम शुनाइट (0.5 टक्के) च्या दोन फवारण्या लागवडीनंतर अनुक्रमे 55 आणि 70 दिवसांनी कराव्यात अशी शिफारस करण्यात येते.

नत्र, स्फुरद, पालाश प्रती हेक्टर खत मात्रा खालील दर्शविलेल्या तक्त्याप्रमाणे विभागुन देण्याची शिफारस करण्यात येते.
हप्ता
दिवस किंवा कालावधी
नत्र (किलो प्रती हेक्टर)
स्फुरद (किलो प्रती हेक्टर)
पालाश (किलो प्रती हेक्टर)


नत्र विद्राव्य खताव्दारे
नत्र युरिया खताव्दारे
एकुण


1
पेरणी
8
4
12
8
8
2
पेरणीनंतर 20 दिवसांनी
10
10
20
10
10
3
पेरणीनंतर 40 दिवसांनी
10
10
20
10
10
4
पेरणीनंतर 60 दिवसांनी
10
10
20
10
10
5
पेरणीनंतर 80 दिवसांनी
8
8
16
8
8
6
पेरणीनंतर 100 दिवसांनी
4
8
12
4
4

एकुण
50
50
100
50
50

4. मराठवाडयातील परभणी जिल्ह्रयामध्ये जमिनी, चारा पिकांत गोवंशाच्या रक्तामध्ये आढळलेल्या सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता लक्षात घेता, या भागातील गोवंशाच्या आहारामध्ये जस्त, मंगल तांबेयुक्त खनिजांच्या मिश्रणाचा समावेश करण्याची शिफारस मान्य करण्यात आली.

5. मराठवाडयातील खरीप बाजरीचे अधिक उत्पादन आर्थिक फायदा मिळण्यासाठी फेरस सल्फेट 0.75 टक्के (75 ग्रॅम प्रती 10 लीटर पाण्यात) ची फवारणी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी करण्याची शिफारस मान्य करण्यात आली.

6. शेततळ्यातील पाण्याचे बाष्पीभवनाव्दारे होणारे नुकसान कमी करण्यासाठी सिटाईल अल्कोहोल 20 मिली ग्रॅम प्रति चौरस मीटर या मात्रेत प्रत्येकी 10 दिवसाच्या अंतराने वापरण्याची शिफारस मान्य करण्यात आली.

7. बि.टी. कापसातील आकस्मित रोप मरचे प्रमाण कमी राहून कापसाचे अधिक उत्पादन अधिक आर्थिक फायदा मिळण्यासाठी पूर्व हंगामी कापसाची लागवड करुन प्रवाही सिंचन पद्धतीने 20 मे नंतर ठिबक सिंचन पद्धतीने 30 मे नंतर किंवा तापमान 39 डिग्री सें. च्या खाली आल्यानंतर मराठवाडा विभागात करण्याची शिफारस मान्य करण्यात आली.

8. घन लागवडी खालील अमेरिकन कापसाचे अधिक उत्पादन अधिक आर्थिक फायदा मिळण्यासाठी कापूस लागवडीनंतर 75 किंवा 90 दिवसांनी झाडाचा शेंडे खुडण्याची किंवा लागवडीनंतर 75 दिवसांनी मेपिक्वेट क्लोराईड 5 टक्के एएस 250 पीपीएम तीव्रतेची (प्रती दहा लीटर पाणीत 25 मिली) फवारणी करण्याची शिफारस करण्यात येते.

9. मराठवाडा विभागात उन्हाळी हंगामातील बाजरीच्या अधिक उत्पादनासाठी 60 मीटर खोलीचे 75 मीमी बाष्पीभवन झाल्यानंतर (फेब्रवारी महिन्यात 15 दिवसांनी, मार्च महिन्यात 10 दिवसांनी, एप्रिल महिन्यात 7 दिवसांनी / च्या अंतराने) प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी देण्याची शिफारस मान्य करण्यात आली.

10. उशिराच्या खरीप हंगामातील मका पिकाचे अधिक उत्पादन आर्थिक फायद्यासाठी जोड ओळीने (45 x 30-75 सेमी) मक्याची पेरणी करुन 120 सेंमी अंतरावरील इनलाईन ठिबक नळीने एक दिवसा आड एकत्रित बाष्पीभवनाच्या 80 टक्के खोलीचे पाणी देऊन विद्राव्य खताव्दारे हेक्टरी नत्र : स्फुरद : पालाश 113:57:57 किलो; नत्र एकूण मात्रेच्या प्रती 12.5 टक्के याप्रमाणे आठ समान हप्त्यात 10 दिवसांच्या अंतराने पेरणीपासून 10 दिवस ते 80 दिवसांपर्यत तसेच स्फुरद पालाश दोन समान हप्त्यात पेरणीचे वेळी आणि पेरणीनंतर 30 दिवसांनी देण्याची शिफारस करण्यात येते.
खते देण्याचे वेळापत्रक
खते देण्याचा कालावधी
खताची मात्रा (113:57:57 किलो / हेक्टर नत्र:स्फुरद:पालाश)
विद्राव्य खते किलो / हेक्टर

नत्र
स्फुरद
पालाश
नत्र
स्फुरद
पालाश
लागवडीच्या वेळी
-
28.5
28.5
-
55
19.6
लागवडीनंतर 10 दिवसांनी
14.13
-
-
30.5
-
-
लागवडीनंतर 20 दिवसांनी
14.13
-
-
30.5
-
-
लागवडीनंतर 30 दिवसांनी
14.13
28.5
28.5
30.5
55
19.6
लागवडीनंतर 50 दिवसांनी
14.13
-
-
30.5
-
-
लागवडीनंतर 60 दिवसांनी
14.13
-
-
30.5
-
-
लागवडीनंतर 70 दिवसांनी
14.13
-
-
30.5
-
-
लागवडीनंतर 80 दिवसांनी
14.13
-
-
30.5
-
-

11. कापूस + सोयाबीन (1:1) आंतरपीक पध्दतीत, अधिक उत्पादन, अधिक आर्थिक मिळकत, अधिक निव्वळ आर्थिक मिळकत आणि तण नियंत्रण कार्यक्षमता मिळण्यासाठी लागवडीनंतर परंतु पीक उगवणीपूर्वी ऑक्शिफ्लोरफेन 23.5 टक्के इसी 0.1 किलो प्रती हेक्टर क्रियाशील घटकाची (425 मिली/हे) फवारणी करुन पेरणीनंतर 6 आठवड्यांनी कोळपणी करण्याची यावी.

12. फ्लुरोसेन्ट प्रोब तंत्रज्ञानावर आधारित वनामकृवि बीबीटीव्ही-आरे' या जनुकीय निदान संच प्रणालीव्दारे जलद, विश्वासार्ह, अचूक व कमीत कमी दरामध्ये केळी पर्णगुच्छ' या रोगाचे केळी पिकाच्या मातृवृक्षापासून तसेच उती संवर्धित रोपापासुन निदान करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

13. शेवग्याची पाने, फुले व शेंगा यांची पौष्टिकत्व युक्त भुकटीचा वापर कॅप्सुलच्या स्वरुपात तयार करण्याच्या तंत्रज्ञानाची शिफारस करण्यात येते.

14. पनीर दोडा (Withania coagulans) फळांचा 0.5 टक्के संहत काढा व 0.3 टक्के सुक्रॅलोजचा वापर करुन कार्बनयुक्त पनीर दोडा पेय तयार करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

15. सोयाबीन लोण्याची फेलावण्याच्या गुणवत्ता वाढीसाठी 0.2 टक्के गवार डिंकाचा वापर करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

16. गहु 20 टक्के, तांदुळ 20 टक्के, मुग डाळ 27 टक्के, सोया डाळ 13 टक्के (सर्व भाजलेले) यांचे पीठ, गाजराची भुकटी 10 टक्के, दुधाची भुकटी 8 टक्के, कोथिंबीर भुकटी 1 टक्का आणि जीरा भुकटी 1 टक्का एकत्र करुन बनविलेले उष्मांक, प्रथिने, लोह आणि कॅलशियम समृध्द वनामकृवि विकसीत डब्लुआरजी पुरक आहार गरम पाण्यात किंवा दुधात मिसळून 7 ते 9 महिने वयोगटातील शिशुला खाऊ घालण्याची शिफारस करण्यात येत आहे.

17. वनामकृवि प्रकाशित बालविकासाची उत्कृष्ट तंत्रे पालकांसाठी मार्गदर्शिकाहे पुस्तक बालकांची योग्य काळजी व विकास, विकासात्मक दोष, त्यांची कारणे व निराकरण यावर आधारित असल्याने सर्व स्तरातील पालकांना व शालेय शिक्षिकांना मार्गदर्शन करण्यासाठी व बालकांच्या हितासाठी आवश्यक असणा-या कृती करण्याकरिता अतिशय उपयुक्त असल्याने त्यांना याविषयी शिक्षित करण्यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शिका म्हणून या पुस्तकाची शिफारस मान्य करण्यात आली.

18. व्यक्तींच्या रक्तातील ग्लुकोजचे व स्निग्धांशाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी वनामकृवि, परभणी विकसीत मल्टिपरपज फंक्शनल फुड मिक्ससकाळचा नाश्ता 50 ग्रॅम सेवन करण्याची शिफारस मान्य करण्यात आली.

19. वनामकृवि प्रमाणित आर्थिकदृष्ट्या फायदेशीर सुधारित कार्यस्थळ आराखड्याची पापड व शेवया गृहउद्योग केंद्रातील महिलांचे आरोग्य व कार्यक्षमता टिकविण्यासाठी शिफारस करण्यात येत आहे.

20. पडदा छपाईकरीता सुती व रेशमी कापडावर 10 टक्के आंब्याच्या कोयींच्या स्टार्चचा, थीकनींग एजन्ट म्हणून वापर करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

21. बाजरी पिकावरील केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी सुडोमोनास फ्लुरोसंन्स (एमवायएस-14) या जैविक बुरशीनाशकाची 8 ग्रॅम प्रती किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

22. तुरीवरील शेंगमाशीच्या व्यवस्थापनासाठी यादृच्छिक पध्दतीने निवडलेल्या शेंगामध्ये एक अळी प्रती 20 शेंगा किंवा 5 टक्के शेंगाचे नुकसान किंवा 2 टक्के बियाण्यांचे नुकसान अशी आर्थिक नुकसान पातळी निश्चित करण्याची शिफारस मान्य करण्यात आली.

23. तुरीवरील शेंगा पोखरणा-या अळीच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 एससी 3 मिली प्रती 10 लीटर पाणी याप्रमाणे 50 टक्के फुलोरा अवस्थेत आणि दुसरी फवारणी फ्ल्युबेन्डामाईड 39.35 एस सी 2 मिली प्रती 10 लीटर पाणी याप्रमाणे शेंगा अवस्थेत करण्याची शिफारस मान्य करण्यात आली.

24. वनामकृवि विकसीत प्रक्रियेमध्ये फोम मॅट ड्रॉर्इंग तंत्रज्ञान वापरुन उत्तम प्रतीची केशर आंबा पोळी बनविण्यासाठी आंब्याच्या रसामध्ये 3 टक्के जीएमएम टाकून ब्लेन्डरव्दारे 2 मिनिटे फिरविल्यानंतर आंबा रसाच्या फोमची जाडी 6 मिलीमीटर ठेवून 60 अंश संल्सिअस तापमानावर 15 टक्के पाण्याच्या अंशापर्यंत ट्रे ड्रायरमध्ये वाळविण्याची शिफारस करण्यात येते.

25. जनावरांच्या मुक्त संचार गोठयाच्या मोकळ्या जागेमधील फरशीसाठी 40 सेंमी चा थर, ज्यामध्ये 20 सेंमी चा दबाई केलेला मुरुम त्यावर 10 सेंमी पीसीसी चा थर व त्यानंतर लाल उभ्या विटाच्या एका थराची 1:6 सिमेंट मालामध्ये बांधकामाची शिफारस मान्य करण्यात आली.

26. मराठवाडयातील रेशीम उत्पादक शेतक-यांच्या अभ्यासामध्ये खत व्यवस्थापन व रोग व्यवस्थापनाविषयी ज्ञान व अवलंबन कमी असल्याचे दिसून येते. यासाठी विविध कृषि विस्तार यंत्रणा, कृषि विज्ञान केंद्र, रेशीम उद्योग संचालनालय व कृषि विद्यापीठ यांनी विविध विस्तार पध्दतीव्दारे वरील तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याची शिफारस मान्य करण्यात आली.

27. एक पीक पध्दती, कर्जबाजारीपणा, दुष्काळ, लग्नायोग्य मुले व मुली तसेच आजारपण या बाबीमुळे शेतकरी आत्महत्या झाल्याचे निदर्शनास आले, यासाठी विस्तार यंत्रणेने सीमांत व लहान शेतक-यांमध्ये एकात्मिक शेती पध्दतीचे अवलंबन आणि जलस्त्रोत निर्मिती व जलसंधारण यामध्ये शेतक-यांचा सहभाग वाढवण्याची शिफारस करण्यात आली.

28. रोग व किडीच्या प्रार्दुभावामुळे पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा, सावकाराचा तगादा, मुलीच्या लग्नाची विवंचना या कारणामुळे शेतकरी तणावग्रस्त असल्याचे निदर्शनास आले, यासाठी सामुहिक विवाह व शासकीय यंत्रणेव्दारे गावपातळीवर मानसशास्त्रीय समुपदेशन व्हावे, अशी शिफारस करण्यात आली.

सौजन्य
डॉ. दत्तप्रसाद वासकर, संचालक संशोधन
डॉ. दिगंबर पेरके, उपसंचालक संशोधन (कृषि अर्थशास्त्र)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी