Pages

Wednesday, July 25, 2018

बी.टी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव


माजिल्हाधिकारी श्रीपीशिवाशंकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली पथकाने दिल्‍या जिल्हयातील
विविध जिनिंग मिल्सना भेटी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व कृषि विभागाच्‍या माध्‍यमातुन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत सर्वत्र कीड रोगाचे सर्वेक्षण करण्यात येत असून दि. 24 जूलै रोजी गुलाबी बोंडअळीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याच्‍या उद्देश्‍याने मा. जिल्हाधिकारी श्री. पी. शिवाशंकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली अप्पर जिल्हाधिकारी श्री अण्णासाहेब शिंदे, कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम झंवर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषि अधिकारी, श्री. सागर खटकाळे, किटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर, तालूका कृषि अधिकारी श्री. प्रभाकर बनसावडे यांच्या पथकाने जिल्हयातील विविध जिनिंग मिल्सना भेटी दिल्‍या. तसेच क्रॉपसॅप प्रकल्पातर्गत ब्राम्हणगाव परीसरातील प्रक्षेत्रास भेट देऊन सर्वेक्षण कामाचा आढावा मा जिल्‍हाधिकारी यांनी घेतला. गुलाबी बोंडअळीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी मोठया प्रमाणात कामगंध सापळे लावण्याचे मा. जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.
दरम्यान मोजे. मांडाखळी ता. परभणी येथे किटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर, डॉ. कृष्णा अंभुरे, तालुका कृषि अधिकारी श्री. प्रभाकर बनसावडे, मंडळ कृषि अधिकारी श्री. के. एम. जाधव यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली असता बी. टी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावाची सुरुवात झाल्याचे आढळून आले.
सदरील आढळून आलेला प्रादुर्भाव हा अल्पप्रमाणात असून त्यासाठी शेतक­यांनी एकात्मिक पध्दतीने व्यवस्थापन करण्‍याचे गरजेचे आहे.
Ø प्रारंभी कीडीच्या नियंत्रणासाठी हेक्‍टरी 5 कामगंध सापळे लावावेत तर मोठया प्रमाणात पतंग पकडण्यासाठी हेक्टरी 20 कामगंध सापळे लावावेत जेणे करुन गुलाबी बोंडअळीचे पंतग एकत्रित मोठया प्रमाणात अकर्षित होऊन नर मादी मिलनामध्ये अडथळा आणता येईल.
Ø पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे.
Ø कापूस पिकांच्या फुलामध्ये अळी असल्यास अळीग्रस्त फुले म्हणजेच डोमकळया हाताने तोडून अळीसकट नष्ट कराव्यात.
Ø निंबोळी अर्काची फवारणी करावी.
Ø आर्थिक नुकसानीची पातळी एक जिवंत अळी प्रती दहा बोंडे किंवा 8-10 पतंग प्रती सापळा सलग तीन रात्री आढळुन असल्‍यास प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्लयु पी 20 ग्रॅम किंवा लॅमडा साहॅलोथ्रीन 5 ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तर पॉवर पंपासाठी हे प्रमाण 3 पट करावे.

गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी वरील प्रमाणे उपाय योजना करुन संभाव्य नुकसान टाळावे असे आवाहन विद्यापीठाच्‍या किटकशास्त्र विभागाने केले आहे.