Pages

Friday, July 27, 2018

एनसीसीच्या वतीने कारगील विजय दिवस वृक्ष लागवड करून साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या वतीने कारगील विजय दिवसाचे औचित्य साधून दिनांक 26 जुलै रोजी परभणी शहरातील  कांचन त्र्यंबकराव कत्रुवार कर्णबधीर विद्यालय येथे वृक्ष लागवड करून साजरा करण्‍यात आला. कारगील युध्‍दात शहिद वीरांना श्रध्‍दांजली वाहण्‍यात आली. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी मुख्याध्यापक श्री. पी. के. जाधव, राष्‍ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी लेप्ट. डॉ. ए. बी. बागडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी लेप्ट डॉ. ए. बी. बागडे यांनी बदलत्या वातावरणात वृक्षलागवडीचे महत्व सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती विमला साळुंके, भागवत भोसले, रवी हिवाळकर, कौस्तुब दिक्षित, महेश दारूळे, विशाल राख, आदींसह एनसीसीचे छात्रसैनिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वप्निल हालगे व आभार आकाश थिटे यांनी केले.