Pages

Tuesday, March 5, 2019

मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्रास रेशीम प्रशिक्षण साहित्‍य व यंत्राचे वाटप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात रेशीम संशोधन केंद्राच्‍या वतीने राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेतील मंजूर निधितुन मराठवाडा विभागात रेशीम किटक संकरवाण कोष उत्पादन व रेशीम शेती तंत्रज्ञान प्रसार प्रकल्पातर्गत मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्राना रेशीम उद्योजक शेतक-यांना प्रशिक्षणाकरिता लागणारे बाल्य रेशीम किटक संगोपन स्थापन करण्या आवश्यक साहित्य व यंत्राचे वाटप दि. 2 मार्च रोजी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाप्रमुख पाहुणे म्हणून संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकरविस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांची उपस्थिती होती तर विद्यापीठ अभियंता डॉ. अशोक कडाळे, पशुशक्ती अभियांत्रीकी विभागाच्या प्रभारी अधिकारी, प्रा. स्मिता सोळंकी, किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर, केंद्रिय रेशीम बोर्डाचे शास्त्रज्ञ श्री ए जे करंडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शनात कुलगूरू मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले कि, जगात कच्या रेशीम उत्पादनात चीन नंतर भारताचा दुसरा क्रमांक परंतु चीमध्‍ये रेशीम कोष उत्पादन खर्च भारताच्‍या तुलनेत कमी आहे. कोष उत्पादन खर्च कमी करण्यासाठी रेशीम उद्योगात शेतकरी गटामार्फत लहान मशीनचा वापर झाला तर उत्पन्न वाढबरोबरमजुरीचा खर्च कमी होइल,सा सल्‍ला त्‍यांनी दिला.
तांत्रिक सत्रात प्रभारी अधिकारी रेशीम संशोधन योजनाचे डॉ. सी. बि. लटपटे यांनी ठिंबक सिंचनवर तुती रोपवाटीका, तुती लागवड, संगोपन गृहात आवश्यक तापमान आणि आद्रता यंत्र आदींचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा चंद्रकांत अडसुळ यांनी केले तर कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी अरूण काकडे, हरिश्चंद्र ढगे आदींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्रातील विषय विशेषतज्ञ विजय मिटकरी (खरपुडी, जालना), तुषार चव्हाण (गांधेली, औरंगाबाद), सुगावे (तोंडापुर, हिंगोली), श्री. शिंदे (सगरोळी, नांदेड), श्री. संदीप देशमुख (लातूर), श्री. राजेसाहेब हारे (मौ. डिगोळअंबा बी), डॉ. संदिप झाडे (पैठण रोड, औरंगाबाद) आदीसह कन्नड (औरंगाबाद) येथील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.