Pages

Saturday, June 22, 2019

वनामकृवित आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने दिनांक २१ जुन रोजी पाचवा आंतरराष्‍ट्रीय योगदिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर कुलसचिव श्री रणजित पाटील, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ हेमांगिणी सरंबेकर, प्राचार्य डॉ ए आर सावते आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यापीठाचे आरोग्‍य अधिकारी डॉ सुब्‍बाराव योगशिक्षक प्रा दिवाकर जोशी, लिंबाजी शिसोदे, रत्‍नाकर मेतेकर, गजानन कोटलवार, अर्जना घनवट यांच्‍यास आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षकांच्‍या मार्गदर्शनानुसार विविध आसन, प्राणायाम आदीचे सामुदायिकरित्‍या प्रात्‍यक्षिके करण्‍यात आली.

यावेळी मागदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, आज धकधकीच्‍या जीवनात मोठा ताण व्‍यक्‍तीवर येत आहे, यामुळे शारीरिक व मानसिक रोगांनी मनुष्‍य ग्रासला जात आहे. योग व आसानांनी मुळे निश्चितच आरोग्‍यपुर्ण जीवन जगणे शक्‍य होईल. योग हा प्रत्‍येकाच्‍या जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे. विशेषत: महाविद्यालयीन जीवनात तरूणांवर योगाचे संस्‍कार झाले पाहिजे, असे ते म्‍हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे व अशोक खिल्‍लारे यांनी केले तर आभार डॉ ए टी शिंदे यांनी मानले. यावेळी उत्‍कृष्‍ट योग व आसन केल्‍याबाबत निवड अधिकारी व विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी - विद्यार्थ्‍यींनी, अधिकारी, कर्मचारी आदी मोठया संख्‍येने उपस्थि होते.