Pages

Tuesday, September 3, 2019

वनामकृवित डिजिटल शेतीवर आधारित प्रशिक्षण प्रकल्‍पाचे उदघाटन

'कृषि उत्‍पादकता वाढीकरिता यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्राव्‍दारे डिजिटल शेती' यावरील सेंटर ऑफ एक्सेलन्‍सचे उदघाटन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास प्रगत कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र राष्‍ट्रीय कृषी उच्‍च शिक्षण प्रकल्‍पांतर्गत 'कृषि उत्‍पादकता वाढीकरिता यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्राव्‍दारे डिजिटल शेती' यावरील सेंटर ऑफ एक्सेलन्‍स प्रशिक्षण प्रकल्‍पास नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेने मान्‍यता दिली असुन सदरिल प्रकल्‍पाचे उदघाटन दिनांक 4 सप्‍टेंबर रोजी प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक मा डॉ पी के घोष यांच्‍या हस्‍ते होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण राहणार असुन शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ प्रभात कुमार, आयआयटी खरगपुरचे डॉ व्‍ही के तिवारी, आयआयटी पवईचे डॉ अमित अरोरा, राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ एस डी गोरंटीवार, अकोल कृषी विद्यापीठाचे डॉ एस आर काळबांडे, प्राचार्य डॉ यु एम खोडके आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे,
सदरिल प्रकल्‍प सन 2019 ते 2022 या तीन वर्ष कालावधी करिता संकल्‍पीत असुन यास अठरा कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्‍यात आला आहे, यात पन्‍नास टक्के वाटा जागतिक बॅक व पन्‍नास टक्के वाटा भारत सरकार कडुन भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या माध्‍यमातुन प्राप्‍त होणार आहे. यात यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलीत यंत्र सारखी डिजीटल साधनांचा समावेश असणा-या विविध संशोधन प्रयोगशाळा निर्माण करून विद्यार्थ्‍यी व संशोधक प्राध्‍यापकांना प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करण्‍यात येणार आहे. या केंद्राव्‍दारे कौशल्‍य प्राप्‍त प्रशिक्षणार्थी डिजिटल शेतीचे तंत्र शेतक-यांपर्यंत नेण्‍याचा प्रयत्‍न करणार आहेत. यात डिजिटल शेतीच्‍या तंत्रज्ञानात्‍मक देवाणघेवाण करिता जगातील अग्रगण्‍य विद्यापीठाशी सामंजस्‍य करार केला असुन यात अमेरिकेतील वॉशिग्‍टन स्‍टेट युनिव्‍हर्सिटी तसेच स्‍पेन, युक्रेन व बेलारूस येथील विद्यापीठांचा समावेश आहे. तसेच पवई व खरगपुर येथील आयआयटी संस्‍थेचे नॉलेज सेंटर म्‍हणुन सहकार्य लाभणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक प्रकल्‍पाचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ गोपाल शिंदे व प्रकल्‍प मुख्‍य समन्‍वयक डॉ आर पी कदम यांनी दिली.

सदरिल प्रकल्‍पाच्‍या अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा