Pages

Tuesday, September 3, 2019

मनुष्‍यांनी इतिहासापासुन धडा घेतला पाहिजे...... डॉ गणेश राऊत

परभणी कृषि महाविद्यालयात गणेशोत्‍सव 2019 निमित्‍त आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयात गणेशोत्‍सवानिमित्‍त्‍ दिनांक 3 सप्‍टेबर रोजी इतिहासाकडुन काय शिकावे या विषयावर पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील इतिहास विभागाचे विभाग प्रमुख डॉ गणेश राऊत यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रभारी प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल हे होते तर व्‍यासपीठावर विभाग प्रमुख डॉ एस डी बंटेवाड, मुख्‍य वसतीगृह अधिक्षक डॉ आर पी कदम, डॉ संदिप बडगुजर, गणेश उत्‍सव समितीचे अध्‍यक्ष अमर आमले, उपाध्‍यक्ष अभिजित पोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ गणेश राऊत आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, जगातील कोणतेही बदल प्रथम मनुष्‍याच्‍या मनात होतात, नंतर ते प्रत्‍यक्षात येतात. मनुष्‍यांनी इतिहासापासुन धडा घेतला पाहिजे. इतिहासाची पुर्नोरोयुक्‍ती होत असते. महात्‍मा गांधी, महात्‍मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांनी व्‍यवस्था बदलुन सुधारणेसाठी कार्य केले. आजही इतिहासातील अनेक बाबींचा उपयोग मनुष्‍याना करित असतो. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ संदिप बडगुजर यांनी केले तर सुत्रसंचालन अक्षय गोडभरले यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.