Pages

Wednesday, October 9, 2019

वनामकृवित वृक्षलागवडीसह वृक्षसंवर्धनावर भर

वनामकृवितील कृषि पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी वृक्षसंवर्धनासाठी सरसावले



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या संकल्‍पनेतुन स्‍वच्‍छ विद्यापीठ, सुंदर विद्यापीठ, सुरक्षित विद्यापीठ व हरित विद्यापीठ अभियान राबविण्‍यात येत असुन विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील विविध प्रक्षेत्रावर आजपर्यंत हजारो वृक्षाची लागवड करण्‍यात आली आहे. केवळ वृक्षलागवड करून न थांबता त्‍या वृक्षाचे संवर्धनाकरिताही विद्यापीठ विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक, अधिकारी कर्मचारी व नागरिकांच्‍या सहकार्याने अभियान राबविण्‍यात येत आहे. या अभियानाचा भाग म्‍हणुन दिनांक 8 ऑक्‍टोबर रोजी विजयादशमीचे औजित्‍य साधुन वैद्यनाथ वसतीगृहात विद्यार्थ्‍यी व प्राध्‍यापकांनी लागवड करण्‍यात आलेल्‍या वृक्षांचे संगोपन करण्‍याच्‍या दृष्‍टीने सकाळी दोन तास श्रमदान केले. यावेळी लागवड केलेल्‍या वृक्षाच्‍या सभोवताली व्‍यवस्‍थीतरित्‍या आळे करण्‍यात येऊन आळया भोवतालचे अनावश्‍यक गवत काढुन वरच्‍या बाजुस आच्‍छादन करण्‍यात आले. या श्रमदानात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ हिराकांत काळपांडे, डॉ राजेश कदम, डॉ धीरज कदम, डॉ सुरेश वाईकर, डॉ रणजित चव्‍हाण, डॉ चंद्रशेखर अंबाडकर, डॉ संदिप बडगुजर, डॉ प्रल्‍हाद जायभाये, विद्यार्थ्‍यी प्रतिनिधी राहुल चौरे, सतीश सुरासे, वैभव ठानगे, विशाल राठोड, तात्‍यासाहेब, गडदे आदीसह कृषि विद्याशाखेच्‍या पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यींनी मोठया संख्‍येने सहभाग नोंदविला.