बीबीएफ पेरणी यंत्राचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन
दिनांक 1 जुलै
रोजी माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतरावजी नाईक यांचा जन्म दिवस कृषि दिन म्हणून साजरा
करण्यात येतो. यावर्षी वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांच्या वतीने संपुर्ण मराठवाडयात दिनांक 1
जुलै ते 7 जुलै दरम्यान कृषि संजीवनी सप्ताह अभियान राबविण्यात येत असुन
दिनांक 1 जुलै रोजी परभणी तालुक्यातील मौजे बाभळी येथे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण प्रमुख
उपस्थित विद्यापीठ शास्त्रज्ञांनी शेतक-यांच्या बाधांवर जाऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमास
जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती श्री.गंगाप्रसाद आनेराव, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ.पी.आर.देशमुख,
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. यु. एन. आळसे, तालुका कृषि अधिकारी श्री. प्रभाकर बनसावडे,
मंडळ कृषि अधिकारी श्री. भगवान कच्छवे आदीची प्रमुख
उपस्थिती होती. यावेळी सोयाबीनची रुंद
वरंबा सरी (बीबीएफ) यंत्राने
पेरणीचे प्रात्यक्षिक कृषि अभियंता डॉ. स्मिता सोळंकी यांनी
दाखविले.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, बीबीएफ पध्दतीचे
सोयाबीन पेरणीमुळे एकरी निश्चितच किमान एक ते दोन Ïक्वटल वाढ
होते, संपुर्ण राज्याचा विचार करता, बीबीएफ पध्दतीमुळे उत्पन्नात भरिव वाढ
होईल. जास्तीत जास्त शेतक-यांपर्यंत या तंत्राचा प्रसार करण्यात येत आहे. विद्यापीठ शेतकरी उपयोगी संशोधन करुन कृषि
तंत्रज्ञान कृषि विभागाच्या
सहकार्याने शेतक-यांपर्यत पोहचवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असते, असे ते म्हणाले.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी सोयाबीन बियाणे उगवणी संदर्भात मार्गदर्शन करून सोयबीनचा अंकुर नाजुक असल्यामुळे बियाण्याची कमीत कमी हाताळणी करावी व 3 सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरु नये, बीजप्रक्रिया करुनच पेरणी करण्याचा सल्ला दिला. श्री.गंगाप्रसाद आनेराव यांनी बाभळी गावचा विकास करण्यासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले तर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.संतोष आळसे यांनी कृषि विभागाच्या विविध योजना सांगितल्या. यावेळी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ.पी.आर.देशमुख, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रमुख डॉ.यु.एन.आळसे यांनी गटचर्चेत भाग घेवून शेतक-यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका कृषि अधिकारी श्री. प्रभाकर बनसावडे, मंडळ कृषि अधिकारी श्री.भगवान कच्छवे आदींनी परिश्रम घेतले.