Pages

Friday, February 19, 2021

समाजाभिमुख कार्य करणा-या माजी विद्यार्थ्‍यांचा विद्यापीठास सार्थ अभिमान ...... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

कर्तबगार व कर्तव्‍यदक्ष अधिकारी तथा विद्यापीठाचे माजी विद्यार्थी विभागीय वन अधिकारी मा श्री कामाजी पवार व मनपा आयुक्‍त मा श्री देविदास पवार यांच्‍या हस्‍ते विद्यापीठात वृक्षारोपण

परभणी कृषि विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्‍लेखनिय योगदान देत असुन  समाजभिमुख कार्य करणा-या माजी विद्यार्थ्‍याचा विद्यापीठास सार्थ अभिमान आहे. विद्यापीठात बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातुन येतात अनेक अडजणीवर मात करून यश प्राप्‍त करतात. हेच विद्यार्थी राज्‍यातील प्रशासनात कार्य करतांना सातत्‍यपुर्ण समपर्ण भावनेने समाजासाठी कार्य करतात. स्‍वच्‍छ विद्यापीठ, हरित विद्यापीठ व सुरक्षित विद्यापीठ ही संकल्‍पना राबवितांना वन विभागात अनेक माजी विद्यार्थी असलेले अधिका-यांनी मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.  

वसंतराव नाईक कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विभागीय वन अधिकारी मा श्री कामाजी पवार व मनपा आयुक्‍त मा श्री देविदास पवार यांच्‍या हस्‍ते विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालय परिसरात दिनांक १८ फेबुवारी रोजी वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्‍न झाला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ तुकाराम तांबे, प्रभारी प्राचार्या डॉ जया बंगाळे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, डॉ हिराकांत काळपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रशासकीय क्षेत्रात व समाजाभिमुख कार्य करणारे कर्तबगार व कर्तव्‍यदक्ष अधिकारी तथा विद्यापीठाचे माजी विद्यार्थी विभागीय वन अधिकारी मा श्री कामाजी पवार व मनपा आयुक्‍त मा श्री देविदास पवार यांचा कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते विशेष सत्‍कार  करण्‍यात आला.

भाषणात मा श्री कामाजी पवार म्हणाले की, विद्यापीठात घेतलेल्‍या ज्ञान व संस्कारामुळेच प्रशासनात विविध पदावर चांगले कार्य करण्‍याची उर्मी मिळते. सामाजिक कार्याची सवय ही विद्यार्थीदशेत लागली. महाविद्यालयीन जीवनातच गुरूंनी केलेले मार्गदर्शन व संस्‍कार यामुळेच आमचे व्‍यक्तिमत्‍व विकसित झाले, कृषि विद्यापीठ राबवित असेलेले हरित विद्यापीठ उपक्रम निश्चितच एक स्‍त्‍युत्‍य उपक्रम असुन यास वन विभागाचे वेळोवेळी सहकार्य राहील. तसेच मा श्री देविदास पवार म्‍हणाले की, महाविद्यालयीन जीवनातील अनुभवाची शिदोरीच्‍या बळावर प्रशासकीय क्षेत्रात चांगले कार्य करतांना शक्ती मिळते. गुरूच्‍या हस्‍ते शिष्‍यांचा सत्‍कार होणे म्‍हणजेच जीवनातील अत्‍यंत आनंददायी क्षण आहे

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ मीना वानखेडे यांनी केले तर प्रास्‍ताविक डॉ हिराकांत काळपांडे यांनी केले. कार्यक्रमास कॅफो श्री काळदाते, वन अधिकार श्री कच्‍छवे, श्री ऋषिकेश चव्‍हाण, वन अधिकार कु.सुरेखा नरवाडे, डॉ गजानन गडदे, डॉ जयकुमार देशमुख, डॉ आशाताई देशमुख, प्रा डि एफ राठोड आदींसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.