वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात भव्य विज्ञान संकुल उभारण्यात
येणार असुन याकरिता विद्यापीठ व परभणी खगोलशास्त्र संस्था यांच्यात दिनांक २१
नोव्हेंबर रोजी सामंजस्य करार करण्यात आला. सदरिल विज्ञान संकुल उभारणी करिता आमदार माननीय डॉ राहुल पाटील यांनी पुढाकार घेतला. सदरिल संकुलच्या निर्मितीसाठी तीन कोटीचा निधी उपलब्ध होणार
असुन लवकरच नियोजित विज्ञान संकुल निर्मितीची प्रक्रिया
सुरू करण्यात येणार आहे. सामंजस्य करार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर
प्रमुख पाहुणे म्हणुन माननीय आमदार डॉ राहुल पाटील हे होते होते. यावेळी विख्यात वैद्यकिय चिकित्सक डॉ रामेश्वर नाईक, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक
डॉ दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, प्राचार्य डॉ उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी करारावर विद्यापीठाच्या वतीने शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव
डॉ धीरजकुमार कदम आदींनी सहया केल्या तर परभणी खगोलशास्त्र संस्थेच्या वतीने
डॉ रामेश्वर नाईक, ओमप्रकाश तलरेजा, सुधीर सोनुनकर आदींनी सहया केल्या.
याप्रसंगी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, वनामकृवि व परभणी खगोलशास्त्र संस्थाचा यांच्यातील
सांमजस्य करार हा एक ऐतिहासिक क्षण ठरेल. नियोजित विज्ञान
संकुल हे विज्ञानातील विविध विद्याशाखेंचा समावेश
असलेले आगळेवेगळे दालन तयार करण्यात येणार असुन यास भविष्यात ज्ञान गंगेचे
स्वरूप प्राप्त होईल. नवीन शैक्षणिक धोरणात मुलभुत
विज्ञान, उपयोजित विज्ञान व इतर शाखा एकत्रित येऊन
बहुविद्याशाखीय शिक्षणाचा समावेश आहे, हे विज्ञान संकुल नवीन
शैक्षणिक धोरणाची नांदी असेल. नुकतेच कृषि शिक्षण हे
शालेय शिक्षणात समाविष्ठ केले आहे. कृषि विज्ञान सोबतच
मुलभुत विज्ञान व उपयोजित विज्ञानातील नवनवीन संकल्पना एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांना
पाहण्यास मिळणार आहेत. यात अंतराळ विज्ञान, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी पर्यावरणशास्त्र, खगोलशास्त्र
आदींची समावेश असणार आहे. परभणी कृषि विद्यापीठाने
डिजिटल शेती तंत्रज्ञानात आघाडी घेतली असुन विज्ञान संकुलाच्या माध्यमातुन ही
चळवळ अधिक व्यापक होणार आहे. संकुलामुळे युवकांमध्ये
वैज्ञानिक प्रबोधन होणार असुन मुलभुत व उपयोजित
विज्ञानामुळे शेती विज्ञान ही अधिक प्रगल्भ होणार आहे. याचा
लाभ विद्यार्थी व संशोधनकांना होणार असुन या माध्यमातुनच
उदयाचे आतंरराष्ट्रीय दर्जाचे शास्त्रज्ञ घडतील. या
प्रकल्पात परभणी कृषि विद्यापीठ नॉलेज पार्टनर राहणार आहे.
मार्गदर्शनात माननीय आमदार डॉ राहुल पाटील म्हणाले, परभणी हे शिक्षणाचे व संशोधनाचे माहेरघर
निर्माण व्हावे, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये
वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा. तसेच आपल्या
भागातील विद्यार्थ्यांतुन आंतरराष्ट्रीय र्कीतीचे शास्त्रज्ञ घडावेत हा दृष्टीकोन
ठेऊन विज्ञान संकुलाचे कार्य हाती घेण्यात आले आहे. विद्यापीठात
आंतरराष्ट्रीय दर्जाचे विज्ञान संकुल विकासत होणार असुन याकरिता तीन कोटीचा निधी
उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे शैक्षणिक
पर्यटनास चालना मिळणार आहे. हे विज्ञान संकुल उभारणीचे
कार्य एक क्रांतीकारक पाऊल ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी
व्यक्त केली.
नियोजित विज्ञान संकुलाबाबत बोलतांना मा डॉ रामेश्वर नाईक म्हणाले की, मराठवाडयातील
ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ बनन्याची
क्षमता आहे, त्या क्षमतेस वाव देण्याची गरज आहे. परभणी खगोलशास्त्र संस्थेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांमध्ये
वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याची चळवळीस नियोजित विज्ञान संकुलामुळे गती
प्राप्त होणार आहे. परभणीतीलच नव्हे तर राज्यातील
विज्ञान प्रेमी करिता नियोजित विज्ञान संकुल दिशादर्शक ठरेल. विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शक म्हणुन हे संकुल कार्य करेल. नवीन शैक्षणिक धोरणानुसार कोणतेही विद्याशाखे एक स्वतंत्रपणे कार्य न करता, सर्व विद्याशाखा एकत्रित कार्य करणार आहेत, हे
विज्ञान संकुल राज्यातीलच नव्हे देशातील एक अनोखे संकुल राहणार आहे. या करिता आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संस्थेची मदत होणार आहे. औंढ नागनाथ परिसरात गुरूत्व लहरीचा अभ्यास
करणारी जागतिक किर्तीची नासानंतरचे तिस-या क्रमांकाची लिगो नावाची प्रयोगशाळेेेची
उभारणी होत आहे. सदरिल प्रयोगशाळेत आपल्याही विद्यार्थ्याना संधी प्राप्त होऊ
शकेल. लवकर विज्ञान संकुल संकल्पने मुर्त स्वरूप देण्याकरिता
पुढील महिन्या दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी
दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्पाचे मुख्य डॉ कैलास डाखोरे यांनी केले. कार्यक्रमास डॉ संजीव बंडेवाड, डॉ गोपाल शिंदे, डॉ एम जी जाधव, डॉ ए एस जाधव, डॉ के एस बेग, डॉ एस पी मेहत्रे, डॉ संतोष कदम, डॉ अनंत लाड, ओमप्रकाश तलरेजा, सुधीर सोनुनकर, विजयकिरण नरवाडे, बालाजी कोंढरे, वेदप्रकाश आर्या, डॉ रंजीत लाड, पदमाकर पवार, दिपक शिंदे, प्रसन्ना भावसार आदी उपस्थित होते.