Pages

Thursday, December 30, 2021

जागतिक पातळीवरील उपयुक्‍त कृषि संशोधन राज्‍यातील शेतक-यांना उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्‍टीने कृषि विद्यापीठांनी प्रयत्‍न करावा ........ कृषिमंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे

चारही कृषि विद्यापीठाची संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची ४९ वी बैठक संपन्‍न

बैठकीत कृषि विद्यापीठांच्‍या ९ विविध पिकांच्‍या नवीन वाण, १५ कृषि अवजारांसह एकुण १९५ शिफारशींना मान्‍यता

राज्‍यातील चारही विद्यापीठाच्‍या स्‍थापनेस ५० वर्ष पुर्ण झाले असुन संशोधनाच्‍या माध्‍यमातुन विविध पिकांची अनेक वाणकृषि अवजारे व कृषि तंत्रज्ञान शिफारसी विकसित केले आहेत. हे संशोधन राज्‍यातील शेतकरी बांधवाच्‍या प्रगतीच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत मोलाचे आहे. शासनकृषि विभाग व कृषि विद्यापीठे या सर्वांचे उद्दीष्‍ट हे राज्‍यातील शेतकरी बांधवाची प्रगती करणेत्‍यांच्‍या जीवनातील अडीअडचणी दुर करणे हाच असुन कृषि विद्यापीठात झालेले संशोधन कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्रे यांच्‍या माध्‍यमातुन शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येत आहे. शेतकरी बांधवाच्‍या शेतात हे संशोधन अवलंबताना येणा-या अडचणीचा आढावा घेऊन पुन्‍हा यात सुधारणा कराव्‍यात. माननीय मुख्‍यमंत्री मा श्री उध्‍दवजी ठाकरे साहेब यांच्‍या विकेल ते पिकेल संकल्‍पनेनुसार विद्यापीठ विकसित विविध पिक वाणयातील अधिक किंमत देणारे वाण असेल पाहिजेत. दर्जेदार शेतमालशेतमाल मुल्‍यवर्धनकृषि प्रक्रिया उद्योग आदींना पाठबळ देण्‍याचे कार्य शासन करीत आहे.  कृषि विभागाच्‍या माध्‍यमातुन शेतमाल विक्री व्‍यवस्‍थापनावर कार्य चालु आहे. जागतिक पातळीवरील उपयुक्‍त असे कृषि संशोधन राज्‍यातील शेतकरी बांधवांना उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्‍टीने कृषि विद्यापीठाने प्रयत्‍न करावाअसा सल्‍ला कृषिमंत्री तथा कृषि विद्यापीठेचे प्रतिकुलपती मानाश्रीदादाजी भुसे यांनी यांनी दिला.  

महाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा मानल्‍या जाणा-या संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची ४९ वी बैठकीचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणी व महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदपुणे यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २४ ते ३० डिसेंबर दरम्‍यान नाहेप प्रकल्‍पाच्‍या सहकार्याने आभासी माध्‍यमातुन करण्‍यात आले होतेसदरिल बैठकीच्‍या समारोपीय कार्यक्रमा प्रसंगी (दि३० डिसेंबररोजी अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते.

सदरिल कार्यक्रमास राज्‍याचे प्रधान सचिव (कृषिमा श्री एकनाथ डवलेकृषि परिषदेचे महासंचालक मा श्री विश्‍वजीत मानेवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवणअकोला येथील डॉपंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु माडॉविलास भालेदापोली येथील डॉबाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु माडॉसंजय सावंतराहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु माडॉप्रशांतकुमार पाटीलवनामकृविचे संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरडॉ पंदेकृविचे संशोधन संचालक डॉ व्‍ही के खर्चेडॉ बासाकोकृविचे संशोधन संचालक डॉ पी एम हळदनकरमफुकृ‍विचे संशोधन संचालक डॉ एस आर गडाखकृषि परिषदेचे संशोधन संचालक डॉ हरिहर कौसडीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मानाश्रीदादाजी भुसे पुढे म्‍हणाले कीबदलास हवामानात शेतीचे मोठे नुकसान होत आहेयावर संशोधन करून संरक्षित शेतीवर भर दयावा लागेल. येणारे वर्ष २०२२ हे वर्ष शासन महिला शेतकरी व महिला शेतमजुर वर्ष म्‍हणुन साजरे करणार आहेत्‍याकरिता शेतकरी महिला व महिला शेतमजुर यांना उपयुक्‍त कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रशिक्षण यावर भर देण्‍यात येणार आहे. विद्यापीठाच्‍या आर्थिकस्थिती सुधारण्‍यादृष्‍टीने विद्यापीठ विक‍‍सित वाण व इतर तंत्रज्ञानाच्‍या पेटंटकरिता प्रयत्‍न करावा. राज्‍यातील अनेक शेतकरी आपल्‍या शेतीत नवनवीन प्रयोग करतातया यशस्‍वी शेतकरी बांधवाचे रिसोर्स बॅक तयार करण्‍यात आली आहेया शेतकरी बांधवाच्‍या संशोधनाचा समावेश विद्यापीठ संशोधनात व्‍हावा. कृषिचे विद्यार्थी केवळ नौकरीच्‍या मागे न लागतानौकरी देणारे उद्योजक झाले पाहिजे यासाठीही प्रयत्‍न करावाअसे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.   

मार्गदर्शनात राज्‍याचे प्रधान सचिव (कृषिमा श्री एकनाथ डवले म्‍हणाले की, चारही कृषि विद्यापीठाने प्रसारित केले वाण व इतर शिफारसी यांची माहिती संकेतस्‍थळावर अद्ययावत कराव्‍यातजेणे करून शेतकरी बांधवा त्‍याचा लाभ घेता येईल. चारही कृषि विद्यापीठाने संशोधनाचा पुढील दहा वर्षाचे उद्दीष्‍ट ठरवुन रोड मॅप तयार करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

कार्यक्रमात कृषि परिषदेचे महासंचालक मा श्री विश्‍वजीत मानेकुलगुरू मा डॉ अशोक ढवणकुलगुरु माडॉविलास भालेकुलगुरु माडॉसंजय सावंतकुलगुरु माडॉप्रशांतकुमार पाटील यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमात विद्यापीठातील निवृत्‍त कृषि संशोधकांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला तसेच विविध पुस्‍तकेघडीपत्रिकांचे विमोचन करण्‍यात आले. 

सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी मानले. एक आठवडा चाललेल्‍या बैठकीत राज्‍यातील चारही कृषि वि़द्यापीठातील तीनशे पेक्षा शास्‍त्रज्ञांनी सहभाग घेतला. कार्यक्रमातील तांत्रिक सत्रातील १२ गटांचा कार्यवृत्‍ताचे वाचन त्‍यात्‍या गटाच्‍या समन्‍वयकांनी केले. सदरिल बैठकीत चारही कृषि विद्यापीठांच्‍या ९ विविध पिकांच्‍या नवीन वाण, १५ कृषि अवजारे व यंत्र आदीसह एकुण १९३ संशोधन शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आलीतसेच राष्‍ट्रीय द्राक्ष संशोधन संस्‍थामांजरी यांचा द्राक्षाचा मांजरी किशमिश वाण व सोलापुर येथील राष्‍ट्रीय डाळिंब संशोधन संस्‍थेचा डाळिंबाचा सोलापुर लाल या वाणास मान्‍यता देण्‍यात आली. सदरिल समितीची पन्‍नासावी बैठक पुढील वर्षी दापोली कृषि विद्यापीठात आयोजित करण्‍यात येणार असुन त्‍यानिमित्‍त डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी दापोली संशोधन संचालक डॉ पराग हळदणकर यांना आयोजनाचा नारळ प्रदान केला.

चारही कृषि विद्यापीठाच्‍या मान्‍य झालेल्‍या शेती पिके व फळ पिकांचे वाण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या तीन विकसित वाणास लागवडी करिता मान्‍यता देण्‍यात आली, यात सोयाबीनच्‍या एमएयु-७२५, करडई पिकांचा परभणी सुवर्णा (पीबीएनएस-१५४) व रब्‍बी ज्‍वारी हुरडाच्‍या परभणी वसंत (पीव्‍हीआरएसजी-१०१) वाणास मान्‍यता देण्‍यात आली. महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ विकसित रब्‍बी ज्‍वारीचा फुले यशोमती, उडीदाच्‍या फुले वसु, तीळाच्‍या फुले पुर्णा तर ऊसाच्‍या फुले-११०८२ या वाणास लागवडीकरिता मान्‍यता देण्‍यात आली. डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ विकसित भात पिकांची पीडीकेव्‍ही साधना व रब्‍बी ज्‍वारी हुरडाची ट्रॉम्‍बे अकोला सुरूची वाणास मान्‍यता देण्‍यात आली.

फळपिकात महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ संशोधीत पेरू फळाच्‍या फुले अमृत तर चिंचाच्‍या फुले श्रावणी वाणास मान्‍यता देण्‍यात आली तर राष्‍ट्रीय द्राक्ष संशोधन संस्‍था, मांजरी यांचा द्राक्षाचा मांजरी किशमिश वाण व सोलापुर येथील राष्‍ट्रीय डाळिंब संशोधन संस्‍थेचा डाळिंबाचा सोलापुर लाल या वाणास मान्‍यता देण्‍यात आली. 

Sunday, December 26, 2021

वनामकृवित आयोजित उती आणि पाने सुक्ष्म मुलद्रव्य तपासणी यावरील कृषि तंत्रज्ञ अधिका­यांचे प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने उती व पाने सुक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी या विषयावरील पाच दिवशीय प्रशिक्षण दिनांक २० ते २४ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते, प्रशिक्षणाचे उदघाटन दिनांक २० डिसेंबर रोजी परभणी कृषि महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल यांच्‍या हस्‍ते झाले तर प्रमुख पाहुणे गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवान आसेवार हे होते. 

पाच दिवशीय प्रशिक्षणात आयोजक विभाग प्रमुख डॉ. प्रविण वैद्य यांनी उती व पर्ण परीक्षणाचे महत्व सांगुन विविध उपकरणांबाबत मार्गदर्शन केले तर पर्ण नमुना घेणे, प्रक्रीया करणे, त्यातील नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, सुक्ष्म अन्नद्रव्य आदीबाबत प्रात्याक्षीकासह मार्गदर्शन डॉ. एस.एल. वाईकर, डॉ. बी.आर. गजभीये, डॉ. स्वाती झाडे, डॉ. ए.एल. धमक, डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले. कृषि विभागाच्या प्रयोगशाळेतील तंत्र अधिकारी यांना प्रयोगशाळेत “उती आणि पाने सुक्ष्म मुलद्रव्य” तपासणी तंत्रज्ञान प्रशिक्षणव्दारे शिकवले गेले.  

प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम दिनांक २४ डिसेंबर रोजी प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाला, यावेळी विभाग प्रमुख डॉ प्रविण वैद्य, जिल्हा मृद चाचणी अधिकारी श्री घुले, डॉ सुरेश वाईकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षनार्थी श्री भोगे, श्री राऊत, श्रीमती आशालता भोसले आदींनी प्रशिक्षणाचा अनुभव मनोगतात व्यक्त केले. प्रशिक्षनार्थीना मान्‍यवरांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. सुत्रसंचलन प्रशिक्षण समन्वयक डॉ. स्वाती झाडे यांनी केले. प्रशिक्षणासाठी मराठवाड-यातील चार जिल्हयातील सव्वीस तंत्र अधिकारी आणि तंत्रज्ञ कृषि सहाय्यक यांनी सहभाग नोंदविला होता.

स‍दरिल प्रशिक्षणाचे मुख्‍य आयोजक विभाग प्रमुख डॉ प्रविण वैद्य हे होते तर प्रशिक्षण समन्‍वयक डॉ स्‍वाती झाडे या होत्‍या. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. महेश देशमुख, डॉ. संतोष चिक्षे, डॉ स्नेहल शिलेवंत, श्री भानुदास इंगोले, श्री अभिजीत पतंगे, श्री अजय चरकपल्ली, श्री अक्षय इंगोले, राकेश बगमारे, निखील पाटील, शुभम गीरडेकर, प्रीयंका लोखंडे, प्रीया सत्वधर,श्री शिरीष गोरे, आंनद नंदनवरे, चेतन जोंधळे व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विभागातील प्राध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

Friday, December 24, 2021

पिकांचे वाण विकसित करण्‍यास लागणारा संशोधनाचा दीर्घकालावधी कमी करण्‍याची गरज...... डॉ पंदेकृविचे कुलगुरू मा डॉ विलास भाले

राज्‍यातील चार कृषि विद्यापीठाची संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची ४९ वी बैठकीच्‍या उदघाटन प्रसंगी प्रतिपादन

कृषि विद्यापीठास विविध पिकांच्‍या वाण विकसित करण्‍यासाठी सहा ते सात वर्षापेक्षा जास्‍त कालावधी लागतो, हेच वाण बदलत्‍या हवामानात कालबाहयही होत आहेत, त्‍यामुळे वाण विकसित करण्‍याचा संशोधन कालावधी कमी करण्‍याची गरज आहे. शेतकरी बांधवाचे उत्‍पन्‍न वाढीकरिता शेतमाल प्रक्रियावर भर दयावा लागेल तसेच उत्‍पादन वाढीबरोबरच शेतीत कमी खर्चिक विद्यापीठ निर्मित तंत्रज्ञानाचा अवलंब वाढवावा लागेल, असे प्रतिपादन डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले यांनी केले.

महाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा मानल्‍या जाणा-या संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची ४९ वी बैठकीचे आयोजन दिनांक २४ ते ३० डिसेंबर दरम्‍यान आभासी माध्‍यमातुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणी व महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदपुणे यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने करण्‍यात आले असुन सदरिल बैठकीच्‍या उद्घाटनाप्रसंगी दिनांक २४ डिसेंबर रोजी अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते.

सदरिल बैठकीस राज्‍याचे प्रधान सचिव (कृषिमा श्री एकनाथ डवलेकृषि परिषदेचे महासंचालक मा श्री विश्‍वजीत मानेस्‍वागताध्‍यक्ष वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू माडॉअशोक ढवण, दापोली येथील डॉबाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु माडॉसंजय सावंतराहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु माडॉप्रशांतकुमार पाटील, वनामकृविचे संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ पंदेकृविचे संशोधन संचालक डॉ व्‍ही के खर्चे, डॉ बासाकोकृविचे संशोधन संचालक डॉ पी एम हाळदनकर, मफुकृ‍विचे संशोधन संचालक डॉ एस आर गडाख, कृषि परिषदेचे संशोधन संचालक डॉ हरिहर कौसडीकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ विलास भाले पुढे म्‍हणाले की, कृषि विद्यापीठाने शेतकरी, कृषिचे विद्यार्थी, कृषि विस्‍तारक यांच्‍या कौशल्‍य विकासाकरिता प्रयत्‍न करावेत. शेतकरी बांधवाचे कृषि उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याच्‍या दृष्‍टीने तसेच राज्‍य शासनाची विकेल ते पिकेल योजना यशस्‍वीतेकरिता केवळ कापुस व सोयाबीन या दोन पिकांवर अवलंबुन राहुन चालणार नाही, याकरिता राज्‍यातील पिक लागवडीत विविध पिकांचा अंतर्भाव करावा लागेल, यात पारंपारिक पिकांचा समावेश आवश्‍यक आहे. आज देश खाद्यतेलाची मोठया प्रमाणात आयात करत आहे, गळीत धान्‍य पिक लागवडीवर भर दयावा लागेल, यात सुर्यफुल पिकाखालील लागवड क्षेत्र वाढविण्‍याची गरज आहे. कृषि विभाग व कृषि विद्यापीठाच्‍या सहकार्याने मागील दोन ते तीन वर्षात कापसावरील गुलाबी बोंडअळी व टोळ धाडीचा उद्रेक राखण्‍यात आपण यशस्‍वी झालो आहोत. 

मार्गदर्शनात राज्‍याचे प्रधान सचिव (कृषिमा श्री एकनाथ डवले म्‍हणाले की, हवामान आधारित राज्‍यात प्रमुख चार कृषि हवामान विभागानुसार चार विद्यापीठाची निर्मिती करण्‍यात आली. राज्‍यातील कृषि विकासात संशोधनाच्‍या माध्‍यमातुन चारही कृषि विद्यापीठाने भरीव असे योगदान दिले आहे. चारही विद्यापीठ व कृषि विभागाच्‍या माध्‍यमातुन पुढील दहा ते पंधरा वर्षाच्‍या कृषि संशोधनाच्‍या आराखडा तयार करण्‍याचे काम चालु आहे. शेतमाल उत्‍पादन वाढीमध्‍ये वाण न‍िर्मितीवर अधिक भर देत आहोत, यास मर्यादा आहेत, यात पिक व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञान विकसित करण्‍यावर संशोधनात भर दयावा लागेल. विविध पिकांपासुन मुल्‍यवर्धीत पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान विकसित करण्‍याची आवश्‍यकता आहे. जमिनीतील कार्बनचे प्रमाण वाढीकरिता प्रयत्‍न करावे लागतील. लहान शेतक-यांना किफायतीशीर यांत्रिकीकरणावर संशोधनात भर दयावा लागेल, असे ते म्‍हणाले.

प्रास्‍ताविक भाषणात कुलगुरू माडॉअशोक ढवण यांनी परभणी कृषि विद्यापीठाच्‍या संशोधनाबाबत माहिती देऊन विद्यापीठ विकसित सोयाबीन व तुर पिकांचे अनेक वाण मराठवाडयातीलच नव्‍हे तर इतर राज्‍यातील शेतकरी बांधवामध्‍ये प्रचलित झाले आहेत. बदलत्‍या हवामानात पिकांची जुने वाण व कृषि तंत्रज्ञान कालबाहय होत असुन नवनवीन वाण व पुरक तंत्रज्ञान निर्मितीवर विद्यापीठाचा भर आहे. दर्जेदार बीजोत्‍पादन निर्मितीचे मुख्‍य उद्दीष्‍ट विद्यापीठाचे आहे. विद्यापीठ जैविक निविष्‍ठा निर्मिती करून विकेंद्रीत पध्‍दतीने मराठवाडयातील प्रत्‍येक जिल्‍हयात उपलब्‍ध करून देत आहे. आदिवासी भागातही कृषि अवजारे व कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार विद्यापीठ करित असल्‍याचे ते म्‍हणाले.  

कृषि परिषदेचे महासंचालक मा श्री विश्‍वजीत मानेराज्‍यातील चारही कृषि विद्यापीठाने गेल्‍या पन्‍नास वर्षाच्‍या कार्यकाळात सहा हजार पेक्षा जास्‍त कृषि संशोधन शिफारसी संशोधनाच्‍या माध्‍यमातुन दिल्‍या आहेत. गेल्‍या पाच वर्षात कृषि शिफारसी मध्‍ये वाढ होतांना दिसत आहेत. जैवविविधताच्‍या दृष्‍टीने राज्‍यातील चारही‍ विद्यापीठाने पारंपारिक पिकांचे गावराण वाणाचे जतन करण्‍यावर भर देण्‍याचा सल्‍ला दिला.

मनोगतात कुलगुरु माडॉसंजय सावंत यांनी हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभूमीवर कमी खर्चीक हवामान केंद्रे विकसत करून गाव पातळीवर उभारण्‍यात यावेत असा सल्‍ला दिला तर कुलगुरु माडॉप्रशांतकुमार पाटील यांनी शेतकरी बांधवा किफायतीशीर डिजिटल शेती तंत्रज्ञान विकसित करण्‍याची गरज असल्‍याचे सांगितले.

संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी मान्‍यवरांचे स्‍वागत करून परभणी कृषि विद्यापीठाच्‍या संशोधनाची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ हरिहर कौसडीकर यांनी मानले. कार्यक्रमास राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व अधिकारी, कृषि विभाग व संलग्‍न विभागातील अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेतले, आभासी कार्यक्रमासाठी वनामकृवितील नाहेप प्रकल्‍पातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहाय्य केले. 

एक आठवडा चालणा-या सदरिल बैठकीच्या तां‍त्रिक चर्चासत्रात ऑनलाईन माध्‍यमाव्‍दारे चारही कृषि विद्यापीठातील साधारणत३०० कृषि शास्त्रज्ञ सहभाग नोंदविणार असुन चारही कृषि विद्यापीठांच्‍या एकुण २२० शिफारशींचे सादरीकरण करण्‍यात येणार असुन यात १२ विविध पिकांच्‍या नवीन वाण व १४ कृषि अवजारांचा समावेश आहे.

Thursday, December 23, 2021

परिसर मुलाखतीव्‍दारे औरंगाबाद कृषि तंत्र विद्यालयाच्‍या ६० कृषि पदविकाधारक विद्यार्थींनीची निवड

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील कृषि तंत्र विद्यालयात दिनांक २३ डिसेंबर रोजी क्‍वेस कॉर्प लिमिटेड या बहुराष्‍ट्रीय कंपनीकडुन परिसर मुलाखती घेण्‍यात आल्‍या. सदरिल कंपनी व्‍दारे विविध खासगी कंपन्‍यासाठी विविध पदाकरिता नौकर भरती केली जाते. मुलाखतीत औरंगाबाद कृषि तंत्र विद्यालयातील कृषि तंत्र पदविकाधारक ७१ विद्यार्थींनीनी सहभाग नोंदवीला, यापैकी ६० विद्यार्थींनीची निवड असेंम्‍बली ऑपरेटर या पदावर कंपनी व्‍दारे करण्‍यात आली. मुलाखती क्‍वेस कॉर्प लिमिटेडचे एचआर प्रमुख श्री आतिशसिंग व श्री सुधाकरराव जिम्‍से यांनी घेतल्‍या, यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डॉ के टी जाधव यांनी विशेष मार्गदर्शन केले तर विद्यालयातील श्रीमती झोटे, श्री हातागळे, श्री मुळे आदींनी सहकार्य केले. या निवडी बद्दल कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍न शिक्षण) डॉ देवराव देवसरकर यांनी अभिनंदन केले.

Monday, December 20, 2021

राज्‍यातील चार कृषि विद्यापीठाची संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची ४९ वी बैठकेचे आभासी माध्‍यमाव्‍दारे आयोजन

राज्‍याचे कृषिमंत्री तथा कृषि विद्यापीठेचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दादाजी भुसे यांच्‍या प्रमुख उपस्थित होणार उदघाटन

बैठकीत विविध पिकांचे एकुण १२ नवीन वाण, १४ कृषि अवजारांसह एकुण २२० कृषि तंत्रज्ञान शिफारसीचे होणार सादरीकरण

महाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा मानल्‍या जाणा-या संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची ४९ वी बैठक दिनांक २४ ते ३० डिसेंबर दरम्‍यान आभासी माध्‍यमातुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणी व महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदपुणे यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने होत आहेसदरिल बैठकीचे उद्घाटन राज्‍याचे कृषिमंत्री तथा कृषि विद्यापीठेचे प्रतिकुलपती मानाश्रीदादाजी भुसे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दिनांक २४ डिसेंबर रोजी आभासी माध्‍यमा व्‍दारे होणार आहेबैठकीस महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष माश्री प्रकाश आबिटकरराज्‍याचे प्रधान सचिव (कृषिमा श्री एकनाथ डवलेकृषि परिषदेचे महासंचालक मा श्री विश्‍वजीत मानेअकोला येथील डॉपंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु माडॉविलास भालेदापोली येथील डॉबाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु माडॉसंजय सावंतराहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु माडॉप्रशांतकुमार पाटील आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार असुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू माडॉअशोक ढवण हे बैठकीचे स्वागताध्यक्ष आहेतअशी माहिती वनामकृविचे संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी दिली आहे.

सदरिल बैठकीत राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेल्या संशोधनातुन शेतक-यांना शाश्‍वत उत्पादन देणारे विविध पिकांचे सुधारीत व संकरीत वाणपशुधनाच्या सुधारीत प्रजातीपीक लागवड तंत्रज्ञानएकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनएकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनमृद व जलसंधारण आदीसह अनेक महत्वाच्या शिफारसीबाबत बैठकीच्या माध्यमातून विचारमंथन होऊन शेतक­-यांसाठी प्रसारीत केल्या जातातशेतक-यांच्‍या दृष्टीने सर्वात महत्वाची बाब म्हणजे सदरिल बैठकीत विविध पिकांचे अधिक उत्पादन देणारे नवीन वाणासह कृषि तंत्रज्ञान शिफारसी मांडल्या जाणार आहेतबैठकीच्या तां‍त्रिक चर्चासत्रात ऑनलाईन माध्‍यमाव्‍दारे चारही कृषि विद्यापीठातील साधारणत३०० कृषि शास्त्रज्ञ सहभाग नोंदविणार आहेप्रथम सत्रामध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदे अंतर्गत असलेल्या महाराष्ट्रातील संशोधन संस्थांचे संचालक तसेच शास्त्रज्ञराज्यशासनाच्या कृषि संलग्‍न विविध विभागाचे अधिकारीकृषि विषयक खात्‍याचे प्रमुखांचे व राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील संशोधन संचालक अहवालाचे सादरीकरण करणार आहेत.

तांत्रिक सत्राच्या एकुण १२ गटांमार्फत विविध शिफारशीवर विचारमंथन होणार आहेतांत्रिक सत्राच्या पहिल्या गटात शेत पीके (पीक सुधारणा व तंत्रज्ञान सुधारात्मक व्युहरचनायावर शिफारशी प्रसारीत होणार आहेतनैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापनउद्यानविद्या आणि पशु व मत्स्य विज्ञान या वरील शिफारशी अनुक्रमे गट क्र३ व ४ मध्ये मांडण्यात येणार आहेतगट क्र५ मध्ये मुलभुत शास्त्रेअन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान या विषयावरील शिफारशी मांडण्यात येणार आहेत तर गट क्रमांक ६७ व ८ मध्ये पीक संरक्षणकृषि अभियांत्रिकी व सामाजीक शास्त्र या विषयावरील शिफारशी मांडण्यात येणार आहेतशेती पीके आणि उद्यानविद्या वाण प्रसारण तसेच कृषि यंत्रे व अवजारे प्रसारणावर चर्चा गट क्र१० व ११ मध्ये होणार आहेजैविक ताण सहन करणारे स्त्रोत नोंदणी प्रस्ताव गट क्र१२ मध्ये मांडण्यात येणार आहे.

चारही कृषि विद्यापीठाच्‍या एकुण २२० शिफारशींचे होणार सादरीकरण

चारही कृषि विद्यापीठांच्‍या एकुण २२० शिफारशींचे सादरीकरण करण्‍यात येणार असुन यात १२ विविध पिकांच्‍या वाण व १४ कृषि अवजारांचा समावेश आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांमार्फत संशोधनावर आधारीत एकुण ५७ शिफारशी बैठकीत सादर करण्यात येणार असुन यात तीन प्रसारीत वाणसात कृषि अवजारे व इतर कृषि तंत्रज्ञान शिफारशींचा समावेश आहे तर राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्‍या एकुण ८१ शिफारशी सादर करण्यात येणार असून यात ७ प्रसारित वाण व १ कृषि अवजारांचा समावेश आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्‍या एकुण ४८ शिफारशी सादर करण्यात येणार असून यात दोन प्रसारित वाण व ६ कृषि अवजारांचा समावेश आहे तर दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्‍या एकुण ३४ शिफारशी सादर करण्यात येणार आहेत.

Tuesday, December 14, 2021

वनामकृवित मधमाशी पालन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकशास्त्र विभाग व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 डिसेंबर रोजी मधमाशी पालन व मध केंद्र योजना जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल व कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम यांची विशेष उपस्थिती होती तर विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, प्राध्‍यापक डॉ. पी. एस, नेहरकर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. टी. जी. यादव, मध पर्यवेक्षक  श्री. डी. व्ही. सुत्रावे, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. अनंत लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल यांनी शेतकरी बांधवाच्‍या शेतीत शाश्‍वतेसाठी व आर्थिक स्‍थैर्य करिता शेतीपुरक व्यवसाय करणे आवश्‍यक असुन मधमाशी पालन, रेशीम उदयोग यामध्‍ये मोठा वाव असल्‍याचे सांगितले तर कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम यांनी सामान्य जीवनात मधमाशीचे महत्व विषद केले. डॉ. संजीव बंटेवाड यांनी मधमाशीचे महत्व अधोरेखित केले तसेच मधमाशी पालन व त्यावरील कीटकनाशकांचा परिणाम या विषयी माहिती दिली. 

तांत्रिक सत्रात डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मधमाशांच्या प्रजाती, मधमाशांचा जीवनक्रम आदी विषयी चित्रफितीद्वारे सखोल माहिती दिली तसेच प्रात्यक्षिकाद्वारे शेतकर्‍यांना व उपस्थितांना मधमाशांच्या विविध बाबींविषयी अवगत केले. श्री. टी. जी. यादव यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली तर श्री. डी. व्ही. सुत्रावे यांनी मधकेंद्र योजना व मध उत्पादन या बद्दल माहिती दिली.  डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. अनंत लाड व डॉ. चंद्रकात लटपटे यांनीही शेतक-यांना मार्गदर्शन केले. निवृत्त सहयोगी प्राध्यापक डॉ. एस. एन. कुलकर्णी यांनी ऑनलाइन पद्धतीने मधमाशी परागीकरन आणि सपुष्प वनस्पती जीवनाबद्दल माहिती दिली.

सदरिल कार्यक्रमाकरिता कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण व संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले यांनी शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचलन डॉ अनंत लाड यांनी केले तर आभार डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले. कार्यक्रमाचा लाभ 80 शेतकरी व कृषि उद्योजक यांनी घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. राजरातन खंदारे, डॉ. संजोग बोकण, अनुराग खंदारे, बालाजी कोकणे, प्रल्हाद बदाले, शालिग्राम गांगुर्डे, दिपक लाड, योगेश विश्वंभरे, सुरेश शिंदे, सोपान ढगे, शेख अली आदीसह पद्व्युतर विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.



Sunday, December 12, 2021

आदिवासी शेतक-­यांचे पिक उत्पादन दुप्पट करण्‍याकरीता वनामकृवि विकसित कृषि औजारांचे बहुमुल्य योगदान..... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

अमरावती जिल्‍हयातील आदिवासी बहुल मौजे लवादा येथे आयोजित शेतकरी मेळाव्‍यात प्रतिपादन

कृषि तंत्रज्ञान केवळ सर्वसामान्‍य शेतक-यांपर्यंत मर्यादीत न राहता, राज्‍यातील दुर्लक्षित भागातील आदिवासी शेतक-यांत पर्यंतही पोहचले पाहिजे. परभणी कृषि विद्यापीठाच्या वतीने काही दत्‍तक गांवातील आदिवासी शेतकरी बांधवाना विद्यापीठ विकसीत औजारांचे वाटप करण्‍यात आले. या औजारामुळे शेतकरी बांधवाचे वेळ व श्रमात बचत तर होतेच, शेती निविष्‍ठातही बचत होते. या यांत्रिकीकरणामुुुळे आदिवासी शेतक-यांचे शेती उत्‍पादन व उत्‍पन्‍न मोठी वाढ होऊन आर्थिकस्‍तर उंचावत आहेआदिवासी शेतक-­यांचे उत्पादन दुप्पट करण्‍याकरीता वनामकृवि विकसित कृषि औजारांचे बहुमुल्य योगदान असल्‍याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.  

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व अमरावती जिल्‍हयातील घातखेडा येथील कृषि विज्ञान केंद्र यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने पशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍पाच्‍या आदिवासी उपयोजनें अंतर्गत मौजे लवाद (ता धारणी जि अमरावती) येथे आदिवासी शेतक-यांकरीता शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दिनांक ११ डिसेंबर रोजी करण्‍यात आले होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानावरून ते बोलत होते.

व्‍यासपीठावर प्रमुख अतिथी म्‍हणुन डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले, स्‍वागताध्‍यक्षा माजी राज्‍यमंत्री तथा श्रमसाफल्‍य फाउंडेशनच्‍या अध्‍यक्षा मा श्रीमती वसुधाताई देशमुख, मेळघाट येथील आमदार मा श्री राजकुमार पटेल, पद्मश्री मा डॉ रविंद्र कोल्‍हे, पद्मश्री मा श्रीमती राहीबाई पोपरे, भोपाळ येथील पशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍पाच्‍या समन्‍वयक डॉ महाराणी दीन, अमरावती जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री अनिल खर्चान, वनामकृविचे संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ पंदेकृविचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ राजेंद्र गाडे, सहकार महर्षी नानासाहेब भिेसे, माजी आमदार श्री केवलराम काळे, डॉ स्मिता सोळंकी, डॉ अतुल कळसकर  आदींची प्रमुख उपस्थिती होती.

स्‍वागतपर भाषणात माजी राज्‍यमंत्री मा श्रीमती वसुधाताई देशमुख यांनी श्रमसाफल्‍या फाउंडेशन हे मेळघाट मधील आदिवासी शेतकरी विकासाकरिता कटिबध्‍द असल्‍याचे सांगितले तर मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ विलास भाले यांनी परभणी कृषि विद्यापीठ आदिवासी शेतक-यांना सुधारित औजारे देऊन करित असलेल्‍या कामाबद्दल समाधान व्‍यक्‍त करून मेळघाट पॅर्टन कृषिक्षेत्रात विक‍सित करून राबविण्‍याचे आवाहन केले. आमदार मा राजेंद्र पटेल यांनी आदिवासी शेतक-यांनी वनामकृवि विकसीत औजारांचा योग्‍यरित्‍या वापर करण्‍याचे आवाहन केले तर पद्मश्री मा डॉ राजेंद्र कोल्‍हे यांनी शेतक-यांना बहुमुल्‍य असे अनुभव कथन करून मार्गदर्शन केले. पद्मश्री श्रीमती राहीबाई पोपरे यांनी आदिवासी शेतकरी महिलांनी देशी बियाण्‍याची जपणुक करण्‍याचा सल्‍ला दिला.

मेळाव्‍यात आदिवासी शेतक-यांना परभणी कृषि विद्यापीठ विकसित बैलचलित व मनुष्‍यचलित कृषि औजारांचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते वाटप करण्‍यात आले. तसेच परभणी कृषि विद्यापीठ विकसित औजारांचा उत्‍कृष्‍ट वापर करून शेती उत्‍पन्‍नात वाढ करणा-या आदिवासी शेतक-यांचा सत्‍कार मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.

प्रास्‍ताविकात संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी परभणी कृषि विद्यापीठ आदिवासी शेतक-यांकरिता असलेल्‍या कार्याची माहिती दिली. सुत्रसंचलन प्रा विनय वसुले यांनी केले तर आभार डॉ स्मिता सोळंकी यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ अतुल कळसकर यांच्‍यासह अमरावती कृषि विज्ञान केंद्र व परभणी विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. मेळाव्‍यास आदिवासी शेतकरी बांधव व महिला मोठया संख्‍येने उपस्थित होते, याप्रसंगी कृषि प्रदर्शनाचेही आयोजन करण्‍यात आले होते.