Pages

Tuesday, April 5, 2022

चौफेर वाचन व कठोर परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली ……. महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्‍य मा श्री. राजीव जाधव

कृषि विद्यापीठामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी बहुतांश हे कष्टकरी शेतकरी मुले असून त्यांनी चौफेर वाचनाची सवय लावून घ्यावी. कठोर परिश्रम करण्याची तयार ठेऊन आपल्यातील न्युनगंड बाजुला ठेऊन स्पर्धेसाठी तयार रहावे. परिस्थिती आणि समाजाकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य तथा महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सचिव श्री राजीव जाधव यांनी व्यक्त केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालयातील विद्यार्थी समुपदेशन कक्षामार्फत दिनांक ५ मार्च रोजी आयोजीत विद्यार्थी संवाद मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ उदय खोडके हे होते तर राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील माजी विभाग प्रमुख डॉ. सुरेश थोरात, आयोजक विद्यार्थी समुपदेशन कक्षाचे प्रमुख प्रा. दिलीप मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

श्री राजीव जाधव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षा प्रशासकीय अधिकारी म्हणुन सामान्य जनतेच्या कशाप्रकारे सेवा करता येते याचे महत्व विषद करुन विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक समज गैरसमज दूर करुन लोकसेवा आयोगाच्या पारदर्शी कारभारावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात प्रा. दिलीप मोरे यांनी श्री राजीव जाधव यांचा परिचय करुन दिला. सुत्रसंचालन श्री ऋषिकेश माने यांनी केले तर आभार डॉ. भारत आगरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी गणेश गायकवाड, शुभम पवार, वैष्णवी लांडे, संगाम वांडेकर, सुग्रीव शिंदे, एकनाथ शिंदे, प्रियंका काळे, कल्याणी शेळके आदींनी परिश्रम घेतले.