Pages

Saturday, February 18, 2023

परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या माजी विद्यार्थ्‍यांनी घेतली वसतीगृहातील खोलीची नुतनीकरणाची जबाबदारी

परभणी कृषि महाविद्यालयाप्रती माजी विद्यार्थ्‍यांनी श्री अनंत चोंदे यांनी व्‍यक्‍त केली कृतज्ञता

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयाची स्‍थापना सन १९५६ साली झाली, या महाविद्यालयाचे ग्रीष्‍म व वसंत वसतीगृहाच्‍या बांधकामास ६० पेक्षा जास्‍त वर्षे पुर्ण झाली असुन करोनाच्‍या काळात वसतीगृहातील खोलींची अवस्था खराब झाली. या वसतीगृहातुन अनेक विद्यार्थी घडले असुन देशात व राज्‍यात विविध पदावर राहुन आपले योगदान देत आहे. अनेक माजी विद्यार्थी आजही वसतीगृहास भेट देऊन महाविद्यालयातील आठवणींना उजळा देतात, याच ग्रीष्‍म वसतीगृहातीत खोली क्र ४२ मध्‍ये वास्‍तव्‍यास असणारे सन १९९२ बॅचचे कृषि पदवीचे माजी विद्यार्थी तथा विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे माजी सदस्य मा श्री. अनंत चोंदे यांनी स्‍वखर्चातुन सदर खोलीचे नुतनीकरण करण्‍याचा संकल्‍प केला. यातुन महाविद्यालयाप्रती आपली कृतज्ञता व्‍यक्‍त केली. सदर खोलीचे नुतनीकरणाच्‍या कामाचे उद्घाटन कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि यांच्या दिनांक १६ फेब्रुवारी रोजी हस्ते करण्‍यात आले, या खोलीचे नुतनीकरण करुन दिनांक २५ फेब्रुवारी रोजी लोकार्पण करण्याचे ठरले आहे. यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी महाविद्यालयाप्रती सामाजिक बांधिलकी जपुन माजी विद्यार्थी श्री अनंत चोंदे यांनी स्‍वखर्चातुन नुतनीकरणाच्‍या संकल्‍पाचे कौतुक केले.   

याप्रसंगी माजी विद्यार्थी श्री अनंत चोंदे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री. विठ्ठलराव सकपाळ, मा. श्री. सुरज जगताप, मा. डॉ. दिलीपराव देशमुख, मा. श्री प्रविण देशमुख, मा. डॉ. अदितीताई सारडा, मा. श्री भागवतराव देवसरकर, मा. माननीय कृषि मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मा श्री. देवळाणकर, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल, विद्यापीठ अभियंता श्री दीपक काशळकर, मुख्‍य वसतीगृह अधिक्षक डॉ. आर. पी. कदम, विद्यापीठ उपअभियंता डॉ. डी. डी. टेकाळे आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमास सहाय्यक वसतीगृह अधिक्षक प्रा. आर. सी. सावंत, प्रा. जी. एन. गोटे,  श्री एस. आर. सोनटक्के, स.ईरफान, श्री ए.टी. आसेगावकर, मलिक पठाण, शेख कासिम, परसराम ढगे, बाबुराव शिंदे, महाजन, जोधंळे, विष्णु ढगे, ढोणे, स्वराज रोडे, ओमकार महाकाळ, डोनोडे, सोनके, केंद्रे, अधागळे, भुमकर, शशांक पाटील, आंबुरे, फडतारे आदीसह विद्यार्थी व वसतिगृह अधिकारी, कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.